Skip to content Skip to footer

“मुख्यमंत्री आयात उमेदवार पवित्र करणे योजना” आधीच ” पवार आयात उमेदवार पवित्र करणे योजना” चालू झालेली होती.

सुजय विखे पाटील पाठोपाठ आता राष्ट्रवादी पक्षाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ विजयसिंह मोहिते-पाटील यांचे चिरंजीव रणजिंतसिंह मोहिते-पाटील यांच्या भाजप प्रवेशाच्या पार्श्वभूमीवर शरद पवार यांचे नातू रोहित पवार यांनी खोचक भाषेत निशाणा साधला आहे. भाजपमध्ये सध्या इतर पक्षांतील नाराज नेते प्रवेश करत आहेत. ही म्हणजे आचारसंहितेच्या काळातील ‘मुख्यमंत्री आयात उमेदवार पवित्र करणे योजना’ असल्याचे रोहित पवार यांनी म्हटले आहे.
कालपर्यंत असणारी विचारधारा आणि राजकीय आरोप एका क्षणात नष्ट करत व्यक्तीला पवित्र करून आपल्या पक्षात घेण्यासाठी ही स्कीम सुरु करण्यात आल्याची टीका रोहित पवार यांनी केली आहे. पण रोहित पवार सध्या आपल्याच पक्षाची जुनी योजना विसरत असताना दिसत आहे. तटकरे, छगन भुजबळ, गणेश नाईक आणि आताच पक्षात प्रवेश केलेले शिरूर मतदार संघाचे उमेदवार अमोल कोल्हे यांना शरद पवार यांनी कोणत्या योजने अंतर्गत आपल्या पक्षात सामावून घेतले. ” फोडा आणि राज्य करा” हीच राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांचीच जुनी योजना आहे.
त्यामुळे दुसऱ्यांना नाव ठेवण्याच्या अगोदर आपल्या पक्षाचा इतिहास जरा रोहित पवार यांनी चाळला तर बर होईल. आज छगन भुजबळ आणि गणेश नाईक यांना आपल्या पक्षात प्रवेश देऊन नाशिक आणि नवी मुंबईची सत्ता भोगणारा हाच राष्ट्रवादी पक्ष आहे. आज शिवसेना पक्षातून तीन-तीन उमेदवार कोणत्या योजनेखाली पवारांनी पळविले असतील हे सुद्धा रोहित पवार यांनी खुलासा करुन सांगावे.

Leave a comment

0.0/5