Skip to content Skip to footer

तुमच्या पक्षातील अर्धा डझन उमेदवारी घरातच दिली आहे – मंत्री पंकजा मुंडे

लोकसभेच्या निवडणुकीला एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करण्यासाठी सर्वच राजकिय पक्ष मागे पुढे पाहत नाहीत. एकाच परिवारातील परंतू दोन भिन्न पार्टीतील नेते तरी कसे मागे राहतील. नात्याने बहीण असलेल्या पंकजा मुंडे यांना उत्तर देण्यासाठी राष्ट्रवादीचे विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे एक मौका सोडत नाहीत. त्यातच ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांनी विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्यावर जहरी टीका केली आहे. ‘आमच्या उमेदवारांची पात्रता विचारतात. पण दोन वाक्य बोलता न येणाऱ्यांची पात्रता विचारत नाहीत’ अशी टीका करत पंकजा मुंडे यांनी पार्थ पवारांच्या भाषणावरही टीका केली आहे. तर आमचेच बंधू पवारांची लाचारी करत असल्याचं ही त्यांनी बोलून दाखविले.

पार्थ सरस की रोहित असं प्रश्न त्यांना विचारल्यानंतर पवार महत्त्वाचे असल्याचं सांगतात. अरे किती दिवस पवारांची चमचेगिरी करणार ?’ असा सवाल ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांनी विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांना केला. त्या नगर लोकसभा मतदारसंघातील भाजपाचे उमेदवार डॉ. सुजय विखे यांच्या प्रचारार्थ पाथर्डीतील सभेत त्या बोलत होत्या. ‘आमच्या उमेदवारांवर आक्षेप घेणाऱ्या दरिद्री लोकांना त्यांची जागा दाखवा. पण लोक हुशार झाले आहेत. आमचे विरोधक म्हणतात हे बाहेरचे आले. यांना कळतं का कोण बाहेरचं आहे? आम्ही इथेच जन्मलो आहोत आणि लहानाचे मोठे झाले आहोत.’ असे ही पंकजा मुंडे यांनी बोलून धनंजय मुंडे यांना टोबना मारला.

त्या पुढे म्हणाल्या की, ‘बीड आणि नगरमध्ये शेजारी-शेजारी दोन डॉक्टर खासदार होणार आहेत. डॉ. प्रीतम मुंडे यांची पात्रता विचारता पण दोन वाक्ये बोलता न येणार्यांची पात्रता विचारत नाहीत. पार्थ पवार आणि रोहित पवार यांच्यामधील कोणता नेता उत्कृष्ट आहे ? असा प्रश्न आमच्या भावाला विचारला. त्यावेळी ते म्हणाले. पार्थ आणि रोहित महत्वाचा नाही तर पवार महत्वाचे आहेत. अरे किती पवारांची चमचेगिरी करणार? तुम्हाला तुमच्या पक्षातील घराणेशाही दिसत नाही. तुमच्या पक्षातील अर्धा डझन उमेदवारी घरातच दिली. हे दिसत नाही. आणि इकडे विखे यांची घराणेशाही तुम्हाला दिसते.

Leave a comment

0.0/5