Skip to content Skip to footer

पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या नावाने संभाजीनगर जिल्हा परिषदेकडून नव्या योजनेची घोषणा.

संभाजीनगर जिल्हापरिषदेने एका नव्या योजनेचा शुभारंभ केला आहे. आता या योजनेला पर्यावरण, पर्यटन आणि राजशिष्ठाचार मंत्री आदित्य ठाकरे यांचे नाव देण्याचा ठराव मंजूर झाला आहे. स्थानिक तरुणांना प्रशिक्षण देऊन स्वतःच्या पायावर उभे करण्याचा या योजनेचा मुख्य उद्देश आहे.

‘आदित्य ठाकरे युवा चारचाकी वाहनचालक परवाना प्रशिक्षण योजना’ असे या योजनेला नाव देण्यात आले आहे. संभाजीनगर जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण समितीने ग्रामीण भागातील मागासवर्गीय युवकांना चारचाकी वाहनचालक प्रशिक्षण व परवाना मिळावा या हेतूने या योजनेचा शुभारंभ करण्यात आला आहे.

या योजनेसाठी ३० लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. किमान दहावी नापास किंवा त्यापेक्षा अधिक शैक्षणिक अर्हतेचे उमेदवार या योजनेसाठी पात्र ठरणार आहेत. या योजनेअंतर्गत मागासवर्गीय युवकांनी चारचाकी वाहनचालक परवाना काढण्यासाठी लागणारे शुल्क आणि एका महिन्याचा निवासी भत्ता यासाठी अनुदान दिले जाणार आहे.

Leave a comment

0.0/5