Skip to content Skip to footer

शरद पवारांना दिल्लीला घर शोधावे लागेल -चंद्रकातदादा पाटील

शरद पवार चार खासदारांच्या जीवावर दिल्लीत सौदेबाजी करत आहेत. या चार जागा भाजपने जिंकल्यावर पवारांना दिल्लीत राहायला घर शोधावे लागेल, असा घणाघात महसुलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केला आहे. सांगोला येथे माढा लोकसभा मतदारसंघातील भाजप उमेदवार रणजीत निंबाळकर यांच्या प्रचाराचा भव्य मेळावा शनिवारी घेण्यात आला होता. आज पर्यंत महाराष्ट्रातील अनेक घराण्यांना देशोधडीला लावणाऱ्या शरद पवार यांच्या तोडीला तोड माणूस भेटलेला आहे असेच राजकीय वर्तुळात बोलले जाते.

शरद पवार यांचा जीव बारामती , माढा , कोल्हापूर आणि सातारा या चार मतदारसंघमध्ये असून यंदा हे चारी मतदारसंघ भाजप जिंकेल असा विश्वास चंद्रकांतदादा पाटलांनी व्यक्त केला. तसेच बारामती धोक्यात असल्याचा इशाराही त्यांनी दिला. शरद पवार या चार मतदारसंघांच्या जीवावर दिल्लीत राजकारण करतात. मात्र या चार जागा भाजपने जिंकल्यांवर त्यांना दिल्लीत राहण्यासाठी घर शोधावे लागेल असा इशारा मंत्री चंद्रकांतदादा पाटलांनी दिलेला आहे.

आज पर्यंत महाराष्ट्रात राजकारण खेळण्यासाठी राष्ट्रवादीचे शरद पवार हे ओळखले जातात. परंतु आज शरद पवार यांच्या तोडीला तोड माणूस म्हणून कोल्हापूरचे चंद्रकांतदादा पाटील यांच्याकडे पहिले जात आहे. आज महाराष्ट्रातील अनेक मोठे घराणे भाजप पक्षात प्रवेश केला आहे त्यात मंत्री गिरीश महाजन आणि चंद्रकातदादा पाटील यांचा मोलाचा वाटा आहे असेही बोलले जात आहे.

Leave a comment

0.0/5