राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्षाच्या सरकार मध्ये गाजलेल्या सिंचन घोटाळ्यावर राज्याचे महसूल मंत्री चंद्रकातदादा पाटील यांनी भाष्य केले आहे. त्यामुळे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची डोकेदुखी ठरलेला सिंचन घोटाळा प्रकरणाच्या केसचा निकाल कोणत्याही क्षणी येऊ शकतो, असा इशारा महसूल मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी दिला आहे. अजित पवार यांच्या प्रकरणात उच्च न्यायालयाला आवश्यक ती कागदपत्रे आम्ही तत्परतेने पुरवत असून, कोणत्याही क्षणी त्याचा निकाल येण्याची शक्यता आहे, असे चंद्रकांतदादा पाटील यांनी बोलून दाखविले आहे.
भारतीय जनता पार्टीने कायद्यानुसार ज्यांच्यावर कारवाई करायची होती, त्यांच्यावर कारवाई केली. म्हणूनच छगन भुजबळ दोन वर्ष आत राहिले, असे चंद्रकांत पाटील यांनी सांगितले. दरम्यान, २०१४ मध्ये विधानसभेच्या निवडणुकीपूर्ती युती तुटली होती. मात्र पुन्हा शिवसेना सत्तेत आली, शिवसेना बाहेर पडावी यासाठी अनेकजण देव पाण्यात ठेवून बसल्याचा उपरोधिक टोलाही चंद्रकांतदादा पाटील यांनी या पत्रकार परिषदेत विरोधकांना लगावला होता. भाजपा सरकारच्या कार्यकाळातच महाराष्ट्र सदन घोटाळ्यात छगन भुजबळ आणि समीर भुजबळ यांचे नाव समोर आले होते. त्यामुळे भुजबळ परिवारातील दोन्ही सदस्यांना जेलची हवा खावी लागली होती आता तीच परिस्थिती अजित पवार यांची होताना काही दिवसात दिसून येईल.