Skip to content Skip to footer

उप-मुख्यमंत्री आमचे अजित पवारच होतील – संजय राऊत

उप-मुख्यमंत्री आमचे अजित पवारच होतील – संजय राऊत

२८ नोव्हेंबरला दादर येथील शिवाजी पार्क येथील मैदानात महाविकास आघाडीच्या नेत्याचा शपथविधी कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमात शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली तर शिसवेना,राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्षाच्या दोन-दोन नेत्यांनी मंत्री पदाची शपथ घेतली होती. तसेच शिवसेना खासदार संजय राऊत यांनी उपमुख्यमंत्री पदाच्या नावावर शिक्कामोर्तब केला आहे.

एका वृत्तवाहिनीशी बोलताना राऊत यांनी उपमुख्यमंत्री पदाबाबत भाष्य केले आहे. याचप्रमाणे राज्यात झालेल्या राजकीय भूकंपाबाबत देखील राऊत यांनी माध्यमांशी बोलताना भाष्य केले. यावेळी बोलत असताना संजय राऊत यांनी उपमुख्यमंत्री पदासाठी राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्या नावावर शिक्कामोर्तब केला.

तसेच अजित पवार यांचे भाजपा सोबत जाऊन मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. त्यांच्या या जाण्याच्या निर्णयावर जेव्हा खासदार संजय राऊतांना विचारले तेव्हा ते म्हणाले की, मी मागे सुद्धा बोललो होतो की शरद पवारांना समजून घेण्यासाठी भाजपाला शंभर जन्म घ्यावे लागतील त्यामुळे महावीकास आघाडीच्या मंत्रिमंडळात अजित पवार हेच उपमुख्यमंत्री पदी विराजमान होणार हे आता जाहीर झालेले आहे असेच समजते.

Leave a comment

0.0/5