Skip to content Skip to footer

कोल्हापुरात किल्यावर आणि अभयारण्यात ३१ डिसेंबर साजरा करणे पडू शकते महागात

कोल्हापुरात किल्यावर आणि अभयारण्यात ३१ डिसेंबर साजरा करणे पडू शकते महागात

दाजीपुर अभयारण्य, राधानगरी, काळम्मावाडी व पन्हाळा यासह जिल्ह्यातील गड-कोट किल्ल्यांवर सरत्या वर्षाला निरोप व नववर्षाच्या स्वागतासाठी होणाऱ्या धांगडधिंग्याच्या पार्टीना यंदा बंदी असेल यासाठी स्थानिक ग्रामस्थांनीच पुढाकार घेतला आहे.तसेच मोकळ्या टेकड्यांवर, वनक्षेत्रात किंवा गडकिल्ल्यांवर जाणाऱ्या तळीरामांवर वन विभागाने बंदी घातली आहे.

स्थानिक ग्रामस्थांनीच काही किल्ल्यांवर ‘बंदी’चे शस्त्र उगारले आहे. ‘नववर्षाच्या पूर्वसंध्येला गड-कोट किल्ल्यांवर बंदी करण्यात आली आहे. , तेव्हा कृपया कोणीही दोन दिवस या किल्ल्यांच्या आजूबाजूला फिरकू नये, अशा आशयाचे संदेश सोशल मीडियावर फिरत आहेत. किल्ले परिसरात होणाऱ्या मद्य पाट्यांना लगाम घालण्यासाठी ग्रामस्थांनी हे पाऊल उचलल्याचे समजते. पोलिसाकडून ही अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी दोन दिवस कडेकोट बंदोबस्त व नाकाबंदी केली जाणार आहे. नववर्षाच्या पूर्वसंध्येला हॉटेल, रिसॉर्टमध्ये जाण्याऐवजी जंगलात, डोंगरद-यांमध्ये तंबू ठोकून कोणत्याही बंधन शिवाय रात्रभर धांगडधिंगा घालण्याची मानसिकता वाढते आहे.

यात दारू पाट्यांचे प्रमाण अधिक आहे. यासाठी किल्ल्यांसोबत दाजीपुर अभयारण्य,राधानगरी,काळम्मावाडी अशा ठराविक ठिकाणांना पसंती दिली जाते आहे तेथे पाट्या करून या पर्यटकांनी कचरा आणि दारूच्या बाटल्या फेकल्याचे याआधी आढळून आले आहे.त्यातूनच यंदा ग्रामस्थांनी गडकिल्ल्यांवर थर्टी फर्स्ट धांगडधिंग्याला बंदीचे पाउल उचलले आहे.पोलिसाकडून ही अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी दोन दिवस कडेकोट बंदोबस्त व नाकाबंदी केली जाणार आहे.

Leave a comment

0.0/5