Skip to content Skip to footer

मनसे-भाजपा युतीवर बाळा नंदगावकर यांचे भाष्य

मनसे-भाजपा युतीवर बाळा नंदगावकर यांचे भाष्य

मुंबईतील पंचतारांकित हॉटेलमध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्यात झालेल्या गुप्त बैठकीनंतर येणाऱ्या दिवसात राज्यात भाजपा-मनसे हे नवीन समीकरण उदयाला येईल अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगताना दिसत होती. मनसेच्या झेंड्याचा रंग बदलण्यापासून मनसे भाजपासोबत येईल अशा चर्चा सुरू होती, पण मनसेचे जेष्ठ नेते बाळा नांदगावकर यांनी मनसे भाजपा बरोबर जाणार नाही असे स्पष्ठ केलेले आहे. त्यामुळे या दोन्ही पक्षांच्या एकत्र येणाऱ्या बातम्यांना आता ब्रेक लागला आहे.

एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत ते म्हणाले की मनसे राजकारणात स्वबळावर काम करत राहील. या संदर्भात उल्लेखनीय आहे की, विधानसभेच्या निवडणुकीनंतर शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांची महाविकास आघाडी झाली. राजकारणात एकटी पडलेली मनसे भाजपासोबत जाईल अशी शक्यता वर्तवण्यात येत होती. काही दिवसांपूर्वी विरोधी पक्षनेते देवेन्द्र फडणवीस आणि राज ठाकरे याची भेट झाल्यानंतर भाजपा आणि मनसे सोबत येण्याची शक्यता वाढल्याची चर्चा होती पण आज बाळा नांदगावकर यांनी असे काहीही होणार नाही, असे सांगितले.

आमदार योगेश कदम यांच्या हस्ते सरपंच सिद्धार्थ कासारे यांचा सत्कार

Leave a comment

0.0/5