Skip to content Skip to footer

फोन टॅपिंग प्रकरणी राज्य शासकांकडून दोन सदस्यीय समितीची नेमणूक

फोन टॅपिंग प्रकरणी राज्य शासकांकडून दोन सदस्यीय समितीची नेमणूक

माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारच्या काळात राज्यातील अनेक बड्या नेत्यांचे फोन टॅपिंग झाल्याचे प्रकरण समोर आलेले होते. या फोन टॅपिंग मध्ये राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे,. खासदार संजय राऊत यांचे फोन टॅप झाल्याचा आरोप माजी फडणवीस सरकारवर लावण्यात आलेला आहे. या फोन टॅपिंग प्रकरणी दोन सदस्यीय समितीची नेमणूक राज्य शासनाकडून करण्यात येणार असून सादर समिती याबाबत चौकशी करेल अशी माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिलेली आहे.

सत्तास्थापनेच्या नाट्यादरम्यान राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, विद्यमान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेत्यांचे माजी देवेंद्र फडणवीस सरकारने फोन टॅप केल्याच्या आरोपाच्या चौकशीसाठी महाराष्ट्र सरकारने रविवारी दोन सदस्यांची समिती गठीत केली. मुख्य सचिव श्रीकांत सिंह आणि सहआयुक्त अमितेश कुमार हे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी स्थापन केलेल्या समितीमध्ये मुख्य सचिव श्रीकांत सिंह आणि सहआयुक्त अमितेश कुमार हे राहणार आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार समितीला याप्रकरणाचा तपास सहा आठवड्यांत पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. तसेच आवश्यकतेनुसार अधिकारी आणि तांत्रिक तंत्रज्ञानदेखील वापरू शकतील. “गृहमंत्री अनिल देशमुख यांनी अतिरिक्त मुख्य सचिव (गृह) संजय कुमार यांना त्वरित श्रीकांत सिंह आणि अमितेश कुमार यांची समिती स्थापन करण्याचे निर्देश दिले आहेत.

Leave a comment

0.0/5