Skip to content Skip to footer

आमदार योगेश कदम यांनी मंडणगड किल्याच्या सर्वांगीण विकासाचे ग्रामस्थांना दिले आश्वासन

आमदार योगेश कदम यांनी मंडणगड किल्याच्या सर्वांगीण विकासाचे ग्रामस्थांना दिले आश्वासन

                      दापोली मतदार संघाचे आमदार योगेश रामदास कदम यांनी मतदार संघातील मंडणगड किल्याला भेट देऊन किल्याची पाहणी केली. या पाहणी दरम्यान वन विभाग अधिकारी तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी उपस्थित होते. किल्याच्या सर्वांगिण विकासाबाबतीत संबंधित अधिकारी, स्थानिक पदाधिकारी व नागरिकांशी आमदार कदम यांनी चर्चा केली.

             दापोली मतदारसंघाला लाभलेली ऐतिहासिक परंपरा व ऐतिहासिक वैभवाचे जतन करणे ही फक्त जबाबदारी नसून आपले कर्तव्य आहे व त्यासाठी प्रत्येक बाबींची अभ्यासपूर्वक कारवाही करण्यात येईल असं मत ही यावेळी आमदार कदम यांनी मांडले.

               या भेटीदरम्यान किल्याची व सभोवतालच्या परिसराची पाहणी करत सखोल माहितीद्वारे किल्ल्याचे संवर्धन करणे, पर्यटन वाढीच्या दृष्टीने त्यासाठी कार्य व प्रबळ पाठपुरावा करून निधी उपलब्ध करुन देण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे आश्वासन यावेळी आमदारांनी ग्रामस्थांना दिले.

                   याप्रसंगी शिवसेना तालुका प्रमुख प्रतापजी घोसाळकर, सभापती प्रणालीताई चीले, उपसभापती स्नेहलताई सकपाळ, माजी सभापती आदेशजी केणे, शिवसेना विभागप्रमुख संजयजी शेडगे, माजी उपतालुकाप्रमुख दोस्त मोहम्मद चोगले, शहरप्रमुख विनोदजी जाधव, उपशहरप्रमुख निलेशजी गोवळे, ग्राहक तालुका प्रमुख सुजीत देवकर, युवासेना तालुकाधिकारी संकेत भोसले, उपतालुकाधिकारी रूपेश निगुडकर आदी पदाधिकारी उपस्थित होते.

Leave a comment

0.0/5