Skip to content Skip to footer

राजू शेट्टी यांनी हातकणंगलेचे वाटोळे केले – शेतकरी नेते रघुनाथ पाटील

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते आणि खासदार राजू शेट्टी यांनी दहा वर्षांत हातकणंगले लोकसभा मतदारसंघाचे वाटोळे केले. या पक्षातून त्या पक्षाकडे जायचे, या त्यांच्या माकड उड्या सुरू आहेत, अशी बोचरी टीका करत नेहमी कोलांट्याउड्या मारणाऱ्यांना यावेळी धोका आहे. त्याचा परिणाम या निवडणुकीत दिसून येईल, असा स्पष्ट इशारा शेतकरी संघटनेचे नेते रघुनाथदादा पाटील यांनी दिला आहे. राजू शेट्टी यांच्या मतदार संघातील शेकर्त्यांचे प्रश्न सुटलेले नाही आहे. आज भाजपा बरोबर जाऊन स्वतःचे भले झाले नाही म्हणून स्वतःच्या फायदयासाठी त्यांनी राष्ट्रवादी-काँग्रेस पक्षाच्या महाआघडीत सामील झालेले आहे.

खासदार राजू शेट्टी यांनी दहा वर्षांत हातकणंगले लोकसभा मतदारसंघाचं काय केले आहे? त्यांनी मतदारसंघाचे वाटोळे केले आहे. असे ही मत पाटील यांनी व्यक्त केले आहे. आज तीन जगासाठी अडून बसलेले राजू शेट्टी यांना राष्ट्रवादी पक्षाने सुद्धा धोका दिलेला आहे. हातकणंगले, बुलढाणा आणि वर्ध्याच्या जागेवर स्वाभिमानी अडून होती, मात्र राष्ट्रवादीच्या यादीत बुलढाण्यातून राजेंद्र शिंगणे यांची उमेदवारी जाहीर केल्यामुळे ‘स्वाभिमानी’चे प्रदेशाध्यक्ष रविकांत तुपकर यांचा पत्ता कट झाला आहे. आज स्वाभिमानी पक्षाची ताकद कोल्हापूर जिल्यात राहिलेली नाही आहे.

मागील अनेक वर्ष सत्ते भोगलेल्या काँग्रेस राष्ट्रवादीच्या नेत्यांनी कोल्हापूरच्या सहकार क्षेत्राचे आणि साखर कारखाण्याचे, सूत गिरणीचे वाटोळे केले आहे. इतकी वर्ष सत्ता भोगून सुद्धा शेजाऱ्यांना चांगले दिवस आलेले नाही आहे आणि आज शेतकर्त्यांचा नेता म्हणवणारे राजू शेट्टी कसे काय राष्ट्रवादी-काँग्रेस बरोबर युती करू शकतात असाच प्रश्न सध्या कोल्हापुरातील जनतेला पडलेला आहे आणि येणाऱ्या निवडणुकीला हातकणंगलेची जनता खासदार राजू शेट्टी यांना घरचा रस्ता दाखवेल हीच सामान्य माणसाची इच्छा आहे असे ही आज कोल्हापुरात बोलून दाखविले जात आहे.

Leave a comment

0.0/5