Skip to content Skip to footer

रुग्णसेवा न देणाऱ्या दवाखान्यांवर गुन्हा दाखल करा! – दत्तात्रय भरणे

रुग्णसेवा न देणाऱ्या दवाखान्यांवर गुन्हा दाखल करा! – दत्तात्रय भरणे

कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे अनेक डॉक्टरांनी आपआपले दवाखाने बंद ठेवले होते. त्यामुळे इतर आजारांनी त्रस्त असलेल्या रूग्णांचे अतोनात हाल होताना दिसत होते. याच पार्श्वभूमीवर समज देऊनही अनेक डॉक्टरांनी शासनाच्या नियमाचे पालन न करता आपला मनमानी कारभार चालूच ठेवला होता. त्यामुळे रुग्णसेवा न देणाऱ्या खाजगी डॉक्टरांवर तात्काळ गुन्हा दाखल करण्याचे आदेश मंत्री दत्तासाहेब भरणे यांनी दिले होते. पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी आज खासगी दवाखान्यांना भेट देवून रुग्ण सेवा देतात की नाही याची पाहणी केली. तसेच रुग्ण व डॉक्टरांच्या अडचणी जाणून घेतल्या. यावेळी त्यांच्यासोबत जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर आणि पालिका आयुक्त पी. शिवशंकर उपस्थित होते.

कोविड-नॉन कोविड रुग्णांची सोय व्हावी, यासाठी खासगी दवाखान्यांना पालकमंत्री भरणे यांनी प्रत्यक्ष भेटी दिल्या. तसेच ज्या दवाखान्यांमध्ये मध्ये अधिसूचित नियामानूसार डॉक्टर, नर्सिंग स्टाफ व जिवरक्षक प्रणाली उपलब्ध नाही अशा दवाखान्यांविरुध्द तातडीने गुन्हा दाखल करु, असे दत्तात्रय भरणे यांनी सांगितले.

या भेटी दरम्यान उपस्थित डॉक्टर, त्यांच्या वेळा व ओपीडी रजिस्टर या बाबत चौकशी केली. हॉस्पिटलच्या अडचणी समजून घेतल्या. काही खासगी दवाखान्यांनी उत्तम काम केल्याबद्वल अभिनंदन ही केले. सध्या सर्व खासगी दवाखान्यातील डॉक्टरांचे सहकार्य अपेक्षित असून, सोलापूर कोरोना मुक्त् करण्यासाठी सर्व दवाखान्यांची मदत लागणार आहे. त्यामुळे आपण दिलेल्या सूचनांचे पालन न केल्यास दवाखान्यांवर कारवाई करण्यात येईल, असे पालकमंत्री भरणे यांनी सांगितले.

Leave a comment

0.0/5