Skip to content Skip to footer

प्लाझ्मा थेरेपी ट्रायल केंद्राचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन.

प्लाझ्मा थेरेपी ट्रायल केंद्राचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन.

राज्यात कोरोनाच्या वाढत्या संसर्गाला आळा घालण्यासाठी प्लाझ्मा थेरेपीचा वापर होत असून, त्याचा रुग्णांना फायदा सुद्दा होत आहे. या थेरपीचा वापर व्यापक प्रमाणात होण्यासाठी महाराष्ट्रात जगातली सर्वात मोठी प्लाझ्मा थेरपी ट्रायल केली जात आहे. त्यामुळे बरे झालेल्या रुग्णांनी अन्य रुग्णांच्या उपचारासाठी प्लाझ्मा दान करण्यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज केले.

यावेळी प्लाझ्मा डोनेशन, प्लाझ्मा बॅंक, प्लाझ्मा ट्रायल आणि इमर्जन्सी ऑथराजेशन या चार सुविधांचेही उद्घाटन करण्यात आले. व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून झालेल्या या सोहळ्यास महसुल मंत्री बाळासाहेब थोरात, जलसंपदा मंत्री जयंत पाटील, उद्योगमंत्री सुभाष देसाई, आरोग्यमंत्री राजेश टोपे, उर्जामंत्री डॉ. नितीन राऊत, मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख, वैद्यकीय शिक्षणमंत्री अमीत देशमुख तसेच संबंधीत जिल्ह्यांचे पालकमंत्री आदी सहभागी झाले होते.

Leave a comment

0.0/5