Skip to content Skip to footer

अंकुश राणेंची हत्या कोणी केली ? राऊतांचा नारायण राणेंना सवाल..!

अंकुश राणेंची हत्या कोणी केली ? राऊतांचा नारायण राणेंना सवाल..!

राज्यात सिने अभिनेता सुशांत सिह राजपूत प्रकरण चांगलेच तापलेले आहे. त्यातच आता भाजपा आणि शिवसेना नेत्यांच्या एकमेकांवर आरोपाच्या फेऱ्या सुद्धा वाढलेल्या दिसून येत आहे. आज टीव्ही ९ या मराठी वृत्तवहिनीला दिलेल्या मुलाखतीत खासदार संजय राऊत यांनी भाजपा खासदार नारायण राणे यांना त्यांचा चुलत भाऊ अंकुश राणे यांची हत्या कोणी केली, असा प्रश्न विचारला आहे. राणे या प्रकरणात का? शांत आहे असा देखील प्रश्न त्यांनी राणेंना विचारला आहे.

या प्रकरणात नारायण राणे का शांत आहेत, त्यांची हत्या कोणी केली असे प्रश्न राऊतांनी उपस्थित करत राणेंना डिवचले आहे. “नारायण राणे यांचा सख्खा चुलत भाऊ अंकुश राणे. या अंकुश राणेंच्या हत्येसंदर्भात राणे पिता-पुत्रांनी त्यांची हत्या कशी झाली, कोणी केली, त्याचे मारेकरी कोण होते त्याबाबत चकार शब्द सुद्धा काढलेला नाही, अशी टीका राऊतांनी राणे पिता पुत्रांवर केली आहे.

Leave a comment

0.0/5