Skip to content Skip to footer

पुणे शहरात मागील २४ तासात १०२४ रुग्ण पॉझिटिव्ह तर पिंपरीत ६२३ रुग्ण पॉझिटिव्ह

पुणे शहरात आज दिवसभरात नव्याने १०२४ रुग्ण आढळल्याने १ लाख ४७ हजार ३५१ एवढी रुग्ण संख्या झाली आहे. तर आज दिवसभरात ४३ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे आज अखेर ३ हजार ५७१ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. करोनावर उपचार घेणार्‍या १२०९ रुग्णांची तब्येत ठणठणीत असल्याने, त्या सर्वांना घरी सोडण्यात आले आहे. त्यामुळे आज अखेर १ लाख २७ हजार ६३९ रुग्ण करोना मुक्त झाले असल्याची माहिती पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागामार्फत देण्यात आली आहे.

पिंपरी-चिंचवड शहरात आज दिवसभरात नव्याने ६२३ करोना बाधित रुग्ण आढळले असून २१ जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. तर १ हजार ४० जण करोनातून बरे झाले असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे. पिंपरी-चिंचवड शहरातील एकूण करोना बाधित रुग्णांची संख्या ७९ हजार ३३८ वर पोहचली असून पैकी ६७ हजार ६३ जण करोनामुक्त झाले आहेत. पिंपरी-चिंचवड महानगर पालिकेच्या रुग्णालयात उपचार घेत असलेल्या सक्रिय रुग्णांची संख्या ३  हजार ७८४ येवढी आहे अशी माहिती महानगर पालिकेच्या आरोग्य विभागाने दिली आहे.

Leave a comment

0.0/5