Skip to content Skip to footer

देशात भाजपाची तानाशानी विरोधात विरोधकांनी एकत्र यायला हवे – संजय राऊत

देशात भाजपाची तानाशानी विरोधात विरोधकांनी एकत्र यायला हवे – संजय राऊत

देशात भाजपाची सत्ता नसलेल्या राज्यांतील राज्य सरकारांना केंद्रात बसलेल्या भाजपाकडून कोणत्याही प्रकारची मदत दिली जात नाही. भाजपाची तानाशाही सुरु आहे. या तानाशाही विरोधात डाव्यांनी एकत्र यायला हवे असे आवाहन शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी केले आहे.

देशात विरोधी पक्षाची दुरावस्था झाल्याचे म्हणत आजच्या सामना अग्रलेखातून काँग्रेसचा खरपूस समाचार घेण्यात आला आहे. या बाबत संजय राऊत यांना विचारले असतां राऊत यांनी आपली भूमिका मांडली आहे. देशात खासदार शरद पवार यांचा राष्ट्रवादी पक्ष सोडला तर कोणी केंद्र सरकारविरोधात ताकतीने लढताना दिसत नाही.

आज शरद पवार काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या बरोबरीचे नेते आहेत. त्यांच्या नेतृत्वाला देशात सर्वमान्यता आहे. त्यामुळे देशात नेतृत्वाचा वणवा आहे असे नाही. भाजपाला आवाहन देण्यासाठी एकत्र येऊन मजबूत संघटना निर्माण करण्याची गरज आहे असे त्यांनी बोलून दाखविले.

Leave a comment

0.0/5