Skip to content Skip to footer

राष्ट्र्वादीत प्रवेश करताच एकनाथ खडसेंनी वर्तवलेला अंदाज खरा ठरला – नवाब मलिक

राष्ट्र्वादीत प्रवेश करताच एकनाथ खडसेंनी वर्तवलेला अंदाज खरा ठरला – नवाब मलिक

मला ईडीची नोटीस मिळाली अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे नेते आणि माजी महसूल मंत्री एकनाथ खडसे यांनी टीव्ही ९ या मराठी वृत्तवाहिनीला दिलेली आहे. खडसे यांना ईडीची नोटीस मिळाली या संदर्भातील बातमी सर्वप्रथम टीव्ही९ या मराठाच्या वृत्तवाहिनीने प्रसिद्ध केली होती.

यावर आता राज्यातील वातावरण तापले असून भाजपने सूडबुद्धीने ईडी प्रकरणात भाजपा खडसे यांना गुंतवायचा प्रयत्न करत आहे अशी टीका होताना दिसत आहे. यावर आता राष्ट्रवादीचे नेते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी भाष्य केले आहे.

भाजप सूडबुद्धीचं राजकारण करत आहे. खडसेंनी भाजप सोडून राष्ट्रवादीमध्ये पक्षप्रवेश करतानाच यासंदर्भात संकेत दिले होते. ‘मी भाजप सोडून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करत असल्याने आता ईडीचा ससेमिरा माझ्यामागे देखील लावतील, मात्र त्यांनी ईडी लावली तर मी सीडी लावेन’ असं विधान खडसेंनी केलं होतं. त्यामुळे खडसेंचा अंदाज खरा ठरला असे असे मलिक यांनी बोलून दाखविले.

Leave a comment

0.0/5