Skip to content Skip to footer

जोपर्यंत कृषी कायदें रद्द होत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच राहणार

केंद्राने पारित केलेल्या शेतकरी कृषी कायद्या विरोधात शेतकरी दिल्ली येथे आंदोलन करत आहे. या कायद्याविरोधात आता संपूर्ण देशभरात केंद्र सरकारविरोधात आंदोलन सुरु झाले आहे. मात्र या आंदोलनावर केंद्र सरकारला आद्याप तोडगा काढणे जमलेले नाही.

त्यातच शुक्रवारी प्रधानमंत्री किसान सम्मान निधी योजनेअंतर्गत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नऊ कोटी शेतकऱ्यांच्या खात्यावर प्रत्येकी दोन हजार रुपये खात्यात जमा केले. त्यांनी यावेळी सात राज्यातील शेतकऱ्यांशी संवाद साधत कृषी कायद्यांचे समर्थन केले. शेतकरी संघटनांनी पंतप्रधानांच्या या भूमिकेला उत्तर दिले असून जोपर्यंत केंद्र सरकार ऐकत नाही, तोपर्यंत आंदोलन सुरूच राहील, अशी आक्रमक भूमिका शेतकरी संघटनांनी कायम ठेवली आहे.

भारतीय किसान युनियनचे नेते जगमोहन सिंग पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाषणावर प्रतिक्रिया देताना म्हणाले, जोपर्यंत केंद्र सरकार ऐकत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच राहणार असून कडाक्याच्या थंडीत शेतकरी गंमत म्हणून आंदोलन करत नाहीत, तर ती त्यांची अपरिहार्यता आहे. पंतप्रधानांच्या भाषणावरुन सरकारला कृषी कायदे रद्द करण्याची इच्छा नसल्याचे स्पष्ट होते.अशी टीका त्यांनी यावेळी नरेंद्र मोदी यांच्यावर केली.

Leave a comment

0.0/5