Skip to content Skip to footer

काँग्रेसचा आज स्थापना दिवस,मात्र राहुल गांधी रविवारी निघून गेले इटलीला

काँग्रेसचा आज स्थापना दिवस,मात्र राहुल गांधी रविवारी निघून गेले इटलीला

पुन्हा एकदा काँग्रेस नेते राहुल गांधी यांचा परदेशी दौरा चर्चेचा विषय ठरला आहे. आज काँग्रेसचा १३६ वा वर्धापन दिन,मात्र या दिवशी कार्यक्रमाला हजर राहण्याचे सोडून रविवारी राहुल गांधी इटलीला निघून गेले आहेत. त्यामुळे राजकीय वर्तुळात उलट-सुलट चर्चेला सुरवात झालेली आहे.

मागच्या दोन विधानसभा निवडणुकीपासून काँग्रेसमध्ये नेतृत्वाच्या वादावरून दोन गट पडले आहेत. पुर्णवेळ अध्यक्षाच्या प्रतिक्षेत असलेली काँग्रेस १३६ वा वर्धापन दिन साजरा करत आहे. एकीकडे काँग्रेस कार्यकर्त्यांना बळ देण्यासाठी राहुल गांधींनी नेतृत्व करण्याची मागणी पक्षातून केली जात आहे. तर दुसरीकडे त्यांच्या कर्तुत्वाबद्दल आक्षेप घेत मित्रपक्षांकडून टीकाटिप्पणी होत आहे. त्यातच त्यांच्या दौऱ्यामुळे ते पुन्हा प्रकाशझोतात आले आहेत.

काँग्रेसच्या वर्धापन दिनाच्या पूर्वसंध्येला राहुल गांधी इटलीला रवाना झाले. त्यांच्या या दौऱ्याबद्दल फारशी वाच्यता करण्यात आली नसली, तरी ते लवकरच भारतात परत असल्याचे काँग्रेसकडून सांगण्यात आले आहे. काँग्रेसच्या वर्धापन दिनालाच राहुल गांधी अनुपस्थितीत असल्याबद्दल पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ते रणदीप सुरजेवाला म्हणाले,”राहुल गांधी हे वैयक्तिक छोट्या दौऱ्यावर असल्याचे यापूर्वी सांगण्यात आले तसेच राहुल गांधी लवकरच भारतात परतणार आहेत अशी माहिती सुरजेवाला यांनी दिली.

Leave a comment

0.0/5