दिवंगत नेते गुरुदास कामत यांचा भाचा समीर देसाई शिवसेनेत दाखल , मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शिवबंधन

दिवंगत-नेते-गुरुदास-कामत-The late-leader-Gurudas-Kamat

दिवंगत नेते गुरुदास कामत यांचा भाचा समीर देसाई शिवसेनेत दाखल , मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शिवबंधन

राज्यात आघाडीचे सरकार स्थापन झाल्यापासून शिवसेना आणि राष्ट्रवादी पक्षात जोरदार इनकमिंग सुरु झली आहे. आता शिवसेना पक्षाने भाजपाला आणखी एक जोरदार धक्का दिला आहे. मुंबई भाजपचे माजी सचिव समीर देसाई यांनी शिवसेनेत जाहीर प्रवेश केला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत हातात शिवबंधन बांधून शिवसेना पक्षात प्रवेश केला आहे.

समीर देसाई हे काँग्रेसचे दिवंगत नेते आणि माजी खासदार गुरुदास कामत यांचे भाचे आहेत. मुंबई महानगर पालिका निवडणुकांच्या तोंडावर सर्वच पक्षांनी मोर्चेबांधणी सुरु केली असताना भाजपसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.
समीर देसाई हे काँग्रेसकडून दोन वेळा नगरसेवक राहिले होते. त्यांनी मुंबई काँग्रेसचे प्रवक्तेपदही भूषवलं आहे. सलग दहा वर्ष समीर देसाई मुंबई विद्यापीठाचे सिनेट सदस्य होते. काँग्रेसमधून त्यांनी २०१४ मध्ये भाजपमध्ये पक्षप्रवेश केला होता. भाजप नेते आशिष शेलार यांच्या उपस्थितीत देसाईंचा भाजपप्रवेश झाला होता. मात्र भाजपातील अंतर्गत गटबाजीला कंटाळून त्यांनी शिवसेना पक्षात प्रवेश केला आहे असे त्यांनी जाहीर सांगितले.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here