पर्यावरण रक्षणासाठी ‘प्लास्टिक द्या, आणि स्टेशनरी घ्या’ कोल्हापूर मनपाचा कौतुकास्पद उपक्रम

आज प्लास्टिकमुळे पर्यावरणाला मोठा धोका निर्माण झालेला आहे. त्यात संपूर्ण कोल्हापुर प्लास्टिकमुक्त करण्यासाठी कोल्हापूर महानगर पालिकेकडून एक अनोखा उपक्रम राबवला जात आहे. ‘प्लास्टिक द्या, आणि स्टेशनरी घ्या’ असा हा उपक्रम राबवण्यात येणार आहे. तसेच संपूर्ण महाराष्ट्रात कोल्हापूर जिल्हा हा उपक्रम राबवणारा पहिला जिल्हा ठरला आहे.

प्लास्टिकमुळे निर्माण होणार कचरा यामुळे पर्यावरणाच्या अनेक समस्या मागच्या काही वर्षात निर्माण होताना दिसत आहे. त्यावर उपाय म्हणून राज्य सरकारने प्लास्टिक पिशव्यांसह काही वस्तूवर बंदी घातली होती.

तसेच प्लास्टिक कचरा होऊ नये, याची खबरदारी घेत विविध योजना आखल्या जात आहेत. त्याच धर्तीवर कोल्हापूर महानगरपालिकेने राज्यात प्रथमच थोडा हटके उपक्रम राबविला आहे. प्लास्टिक कचरामुक्त कोल्हापूर होण्यासाठी’ प्लास्टिक द्या आणि स्टेशनरी घ्या’ असा उपक्रम राबवला आहे. याला नुकतीच सुरुवात झाली आहे.

लहान मुले व विद्यार्थ्यांना पर्यावरणाची गोडी निर्माण व्हावी, हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून महानगरपालिकेने हा उपक्रम सुरू केला आहे. प्लास्टिक जमा करून त्याची योग्य विल्हेवाट लावण्यासाठी हा उपक्रम सुरू केला आहे. त्याला प्रतिसाद देत प्लास्टिक जमा करून स्टेशनरी घ्यावी, असे आवाहन आयुक्त कादंबरी बलकवडे यांनी केले.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here