Skip to content Skip to footer

Dhadak quick movie review: जाणून घ्या कसा आहे, ‘धडक’

जान्हवी कपूर आणि ईशान खट्टर यांचा ‘धडक’ हा सिनेमा काही तासांत प्रेक्षकांच्या भेटीस येतो आहे. शशांक खैतान दिग्दर्शित आणि करण जोहर निर्मित हा चित्रपट ‘सैराट’ या सुपरडुपर हिट मराठी चित्रपटाचा हिंदी रिमेक आहे. साहजिकच चित्रपट कसा आहे, हे जाणून घेण्याची उत्सुकता प्रेक्षकांत आहे. त्यामुळेच ‘धडक’चा ‘quick review’ आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत…

‘धडक’ हा चित्रपट मूळ अर्थाने ‘सैराट’चं आहे, असे म्हणणे वावगे ठरणार नाही. दुसऱ्या शब्दांत सांगायचे तर ‘सैराट’ हाच ‘धडक’चा आत्मा आहे. (‘सैराट’चा अधिकृत हिंदी रिमेक असल्याने हे गृहित धरता येईल) पण तरिही चित्रपट प्रेक्षकांना खिळवून ठेवण्यात यशस्वी ठरतो. चित्रपटाची कथा प्रेक्षकांना आपल्यासोबत वाहावत नेते. अभिनयाबद्दल बोलायचे जान्हवी कपूरचा हा डेब्यू सिनेमा आहे. पण तिचा अभिनय पाहून हा तिचा डेब्यू सिनेमा असावा, यावर विश्वास बसत नाही. तिने यात शानदार काम केले आहे. अख्ख्या चित्रपटात ती कमालीची सुंदर दिसतेय. ईशान खट्टरचा हा दुसरा चित्रपट आहे. त्यानेही ‘खल्लास’ अभिनय केला आहे. या दोन मध्यवर्ती भूमिकांशिवाय आशुतोष राणा याची भूमिकाही तितकीच दमदार आहे.
चित्रपटाची कथा संथपणे पुढे सरकते. चित्रपटाची सगळीच गाणी चांगली आहे. पण अनेकठिकाणी ही गाणी कथेच्या प्रवाहात अडथळा निर्माण करतात. खरे तर या लव्हस्टोरीत फार काही नवे नाही. पण तरिही सरतेशेवटी ही कथा आपल्यावर छाप सोडते. चित्रपटातील संवादही चांगले आहेत.
ज्या प्रेक्षकांनी ‘सैराट’ पाहिलाय ते सगळेच या चित्रपटाशी ‘धडक’ची तुलना करणारचं. पण ज्यांनी ‘सैराट’ बघितलेला नाही, त्यांना ‘धडक’ नक्कीच भावणारा आहे. ‘सैराट’ पाहिलेल्या प्रेक्षकांना आवर्जुन सांगायची गोष्ट म्हणजे, ‘धडक’चा क्लायमॅक्स अचंबित करणारा आहे.

Leave a comment

0.0/5