Skip to content Skip to footer

राहुल गांधी एचडी देवगौडांच्या भेटीला ; जेडीएसची १० जागेंची मागणी

नवी दिल्ली: आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी जोमाने तयारीला लागले आहेत. दरम्यान, लोकसभेच्या जागां संदर्भात राहुल गांधी यांनी बुधवारी माजी पंतप्रधान आणि जेडीएस नेते एचडी देवेगौडा यांची भेट घेतली.

कर्नाटकमध्ये दोन्ही पक्षांची युती आहे. मुख्यमंत्री एचडी कुमारस्वामी यांनी दोन्ही पक्षात मतभेद असल्याचे म्हटले होते. राहुल गांधींच्या भेटीनंतर देवगौडा म्हणाले, ‘कर्नाटकमध्ये लोकसभेच्या २८ जागा आहेत, त्यातील १० जागेची मागणी आम्ही केली आहे. राहुल गांधी, केसी वेणु गोपाल आणि दानिश अली यांच्यासोबत चर्चा केल्यानंतर अंतिम निर्णय होईल’ मात्र काँग्रेस सहयोगी जेडीएसला १० जागा देणार नसल्याची चर्चा आहे.

Leave a comment

0.0/5