शरद पवारांचा वारसदार काळच ठरवेल – सुप्रिया सुळे
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे वाससदार कोण ह्याची चर्चा लोकसभा निवडणुकीपासूनच सुरु झालेली होती. एका खाजगी वृत्त वाहिनीने याबाबत बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे यांना या बाबत विचारले असता शरद पवारांचा वारसदार काळच ठरवेल असे सूचक उत्तर सुळे यांनी दिले. पक्ष आणि पक्षाचे कार्यकर्ते याबाबत कौल देतील. कुठलाही राजकीय पक्ष कोण्या एका पक्षाची मत्तेदारी नाही असे मत सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केले.
यशवंतराव चव्हाण यांचे वारसदार शरद पवार ठरले. वारसदार होणे हे काही मक्तेदारी नाही. असे त्या म्हणाल्या. पुढे हिंदूह्दय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांना अटक करणे बाबत जेव्हा सुप्रिया सुळे यांना विचारण्यात आले. तेव्हा अजित पवार खरे बोलतात असे उत्तर सुळे यांनी दिले. बाळासाहेब ठाकरे यांच्या बद्दलचा एक अनुभव आहे. एका बैठकीत त्यांना तो अनुभव आला होता असे ही त्या म्हणाल्या.
हे ही वाचा-: