Skip to content Skip to footer

आज देशाला मिळणार नवे राष्ट्रपती!

देशाला आज नवे राष्ट्रपती मिळणार आहेत. रामनाथ कोविंद हे राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे NDA आणि मीरा कुमार या संयुक्त पुरोगामी आघाडीच्या UPA उमेदवार आहेत. राष्ट्रपतिपदासाठी १७ जुलैला मतदान घेण्यात आलं होतं. आज सकाळी ११ पासून मतमोजणीला सुरुवात झाली आहे. ३२ राज्यांमधील मतदान पेट्या दोन दिवसांपूर्वीच संसद भवनात पोहोचलेल्या आहेत. मतांचं गणित बघता रामनाथ कोविंद हेच राष्ट्रपतिपदी निवडून येतील, असं बोललं जात आहे.

राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीसाठी सोमवारी १७ जुलै रोजी मतदान घेण्यात आलं होतं.  ३२ राज्यांतील मतपेट्या संसद भवनात पोहोचल्या आहेत. मतमोजणीची व्यवस्था संसद भवनातील ६२ क्रमांकाच्या सभागृहात करण्यात आली आहे. त्याच ठिकाणी १७ जुलै रोजी मतदान व्यवस्था करण्यात आली होती. सर्वात आधी संसद भवनातील मतपेट्या उघडण्यात येतील. त्यानंतर राज्यांमधून आलेल्या मतपेट्या ‘अल्फाबेट’नुसार उघडण्यात येतील. मतमोजणी चार वेगवेगळ्या टेबलांवर होईल. आठ टप्प्यांत ही मतमोजणी होईल. दुपारपर्यंत मजमोजणीची प्रक्रिया संपेल, अशी अपेक्षा आहे. त्यानंतर निवडणूक आयोगाचे अधिकारी निकालाची औपचारिक घोषणा करतील, असं सांगण्यात येत आहे.

दरम्यान, राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीत विविध राज्यांतील ४१२० आमदार आणि ७७६ खासदारांना मतदान करण्याचा अधिकार होता. त्यातील जवळपास ९९ टक्के आमदार-खासदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे.

Leave a comment

0.0/5