बिहार – बिहारचे मुख्यमंत्री म्हणून नीतीश कुमार यांनी राजीनामा दिला आहे. कुमार यांनी आपला राजीनामा राज्यपाल केशरी नाथ त्रिपाठीकडे सादर केला आहे. बुधवारी संध्याकाळी JDU आमदारांच्या बैठकीत राजीनामा देण्याचा निर्णय कुमार यांनी घेतला. आमदारांनी त्यांच्या राजीनाम्याचा निर्णय मान्य केला.या अनपेक्षित घटनेमुळे दोन्ही पक्षांमधील दरी निश्चितच वाढणार आहे.
“RJD च्या नेत्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप झाल्यानंतर आम्ही त्यांना त्या आरोपांचे वर्णन करण्यास सांगितले. आम्ही तेजस्वीनशी भेटलो आणि त्यांना सांगितले की हा एक विरोधकणांचा डाव आहे ,त्यांनी त्या सर्व गोष्टी स्पष्ट कराव्यात. पण असे झाले नाही. परिस्थिती इतकी खराब झाली की मला कामाला जाणे कठीण झाले. आम्ही गठबंधनाचा मान ठेवून आम्ही त्याचे रक्षण करण्याचा प्रयत्न केला. पण माझा अंतर्मन मला हे पुढे चालू ठेवण्याची परवानगी देत नाही, “कुमार म्हणाले
बिहारचे मुख्यमंत्री म्हणून राजीनामा दिल्याबद्दल पंतप्रधानांनी शुभेच्छा दिल्या, त्याबद्दल पंतप्रधान मोदी यांचे आभार नीतीश कुमार यांनी व्यक्त केले.
हमने जो निर्णय लिया उसपर माननीय प्रधानमंत्री @narendramodi के ट्वीट के द्वारा दी गई प्रतिक्रिया के लिए उन्हें तहेदिल से धन्यवाद.
या मोठ्या राजकीय घडामोडीच्या पार्श्वभूमीवर बिहारमध्ये आता भाजपची भूमिकाही अत्यंत महत्त्वपूर्ण मानण्यात येत आहे.
बिहारमधील राजकीय स्थिती
संयुक्त जनता दल : 71
राष्ट्रीय जनता दल : 80
कॉंग्रेस : 27
भाजप : 53
लोकजनशक्ती पक्ष : 2
———-
बहुमत : 122