Skip to content Skip to footer

दगडूशेठ गणपती च्या देखाव्यावरून तो कोसळला आणि बचावला देखील… !

पुणे : श्रीमंत दगडूशेठ गणपती ट्रस्टचा यंदाचा देखावा असलेल्या ब्रह्मणस्पती मंदिरावरील कळस उतरविताना क्रेन सर्व्हिसेस मधील राम जाधव (वय २९) यांना शनिवारी (दि.२) मध्यरात्री अपघात झाला होता.

विसर्जन मिरवणुकीला अधिक उंचीच्या देखाव्यामुळे अडथळा येऊ नये म्हणून मंडळातर्फे देखाव्याचे शिखर काढण्यात येत होते.

गणेश विसर्जन मिरवणुकीकरीता दगडूशेठ गणपतीची मुख्य देखाव्याशेजारील दोन्ही रस्त्यावरील सजावट उतरविताना हा अपघात झाला. कळसावरील घुमट क्रेनच्या सहाय्याने उतरविताना जाधव यांचा तोल गेल्याने ते अपघाताने खाली पडले होते.
गणपती बाप्पाच्या कृपेने त्यांना मोठी इजा झालेली नाही. जाधव यांच्यावर रुबी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर आहे. त्यांच्या पायाला फ्रॅक्चर झाले आहे. तसेच हाताला काही प्रमाणात खरचटले असून हॉस्पिटलचे न्यूरो सर्जन डॉ. आनंद काटकर हे त्यांच्यावर उपचार करीत आहेत. जाधव यांच्या गुडघ्यावर पुढील दोन दिवसात शस्त्रक्रिया करण्यात येणार असून आठ दिवसात घरी सोडणार असल्याचे डॉक्टरांतर्फे सांगण्यात आले आहे. * श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, पुणे*

परंतु अचानक क्रेनवर असणारी व्यक्ती कोसळल्याची घटना घडली.

ही सर्व घटना कॅमेरॅत कैद झाली आहे.

https://youtu.be/o2DWACBuOx8

याबाबत दगडूशेठ मंडळासोबत संपर्क साधला असता विश्वस्त महेश सूर्यवंशी यांनी शुक्रवारी ही घटना घडल्याचे सांगितले.

संबंधित इसमाला कोणतीही मोठी दुखापत झाली नसून केवळ हाताला खरचटले असल्याचेही त्यांनी नमूद केले.

राम जाधव (वय 29) क्रेन सर्व्हिस कामगार.  मिरवणुकीसाठी शो काढत होते. त्याच्या मणक्याला मार लागला आहे. हॉस्पटील मध्ये उपचार सुरू आहेत.देखावा उतरविताना जखमी झालेल्या कामगार राम जाधव यांची प्रकृती स्थिर
रुबी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु

https://maharashtrabulletin.com/chain-snatching-pune-bulletin/

Leave a comment

0.0/5