Skip to content Skip to footer

गणपती बघायला जातंय..?? जरा सांभाळून..चोरट्यांकडून भाविकांच्या सोनसाखळ्या लंपास 

पुणे – शहरात येरवडा, कोंढवा परिसरात घरफोडी आणि चोरीच्या घटना घडल्या, तर गणपती निमित्त दर्शनासाठी आलेल्या भाविकांच्या सोनसाखळी आणि रोकड चोरट्यांनी लंपास केल्याच्या तीन घटना घडल्या.

येरवडा परिसरात महाराष्ट्र हौसिंग बोर्ड येथील मैत्री सोसायटीमधील बंद फ्लॅटमधून चोरट्यांनी सोन्याचे दागिने आणि रोकड चोरी केली. त्यात एक लाख 61 हजार रुपयांचा ऐवज चोरीस गेला. ही घटना गुरुवारी मध्यरात्री घडली.

याप्रकरणी रोहन जगताप (वय 30, रा. येरवडा) यांनी फिर्याद दिली आहे. त्यावरून येरवडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक (गुन्हे) अशोक कदम करीत आहेत.

https://maharashtrabulletin.com/pmpml-news-pmc-pcmc/

कोंढव्यातील एनआयबीएम संस्थेच्या आवारातील चंदनाच्या झाडासह तीन झाडे तोडून चोरीचा प्रयत्न केला. याप्रकरणी श्रीनिवास संधीकर (वय 49, रा. एनआयबीएम कॅम्पस) यांनी तक्रार दिली आहे.

तसेच, श्रीमंत दगडूशेठ गणपती मंदिराच्या मंडपात एका कार्यक्रमादरम्यान चोरट्यांनी खिशातून 25 हजारांची रोकड पळविली. याप्रकरणी स्वप्नील फुगे यांनी (वय 46, रा. बुधवार पेठ) फिर्याद दिली आहे. ही घटना शुक्रवारी (ता. 31) सकाळी अकराच्या सुमारास घडली.

याच परिसरात कुटुंबासमवेत आलेल्या अमृता ढकवळ (वय 32, रा. फुरसुंगी) या महिलेचे एक लाख रुपये किमतीचे मंगळसूत्र चोरट्यांनी लंपास केले. रात्री नऊच्या सुमारास ही घटना घडली.

तसेच, चोरट्यांनी गर्दीचा फायदा घेत महात्मा फुले मंडई परिसरात भवानीशंकर बेहरा (रा. वानवडी) यांच्या मुलीची सोनसाखळी चोरी केली. याप्रकरणी विश्रामबाग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अधिक माहितीसाठी

Leave a comment

0.0/5