पुणे – PMPML चे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक तुकाराम मुंढे यांना एका व्यक्तीने जीवे मारण्याची पत्राद्वारे धमकी दिली आहे.
हा खळबळजनक प्रकार शुक्रवारी सायंकाळी साडेचारच्या सुमारास उघडकीस आला. ज्येष्ठ नागरिकांच्या मासिक पासच्या शुल्कामध्ये वाढ केल्याच्या कारणावरून ही धमकी देण्यात आली आहे.
याप्रकरणी PMPML चे सहव्यवस्थापक अजय राजाराम चारखानकर यांनी सायंकाळी तक्रार दिली.
त्यावरून स्वारगेट पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भुजंगराव मोहिते-पाटील (रा. सुखसागरनगर, कात्रज) असे धमकी देणाऱ्या व्यक्तीचे नाव असल्याचे पोलिसांनी सांगितले.
https://maharashtrabulletin.com/faster-fene-teaser/
स्वारगेटचे पोलिस निरीक्षक (गुन्हे) मच्छिंद्र पंडित यांनी दिलेल्या माहितीनुसार, PMPML च्या कार्यालयात शुक्रवारी (ता. 15) आलेल्या टपालात हे पत्र एका कर्मचाऱ्याच्या निदर्शनास आले.
“ज्येष्ठ नागरिकांच्या मासिक पासच्या शुल्कामध्ये 55 टक्के वाढ करण्यात आली आहे. तुम्ही मनमानी कारभार करत आहात,’ असे पत्रात नमूद करण्यात आले आहे.
दरम्यान, ज्या नावाने हे पत्र दिले आहे, ते नाव बनावट असल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. हे पत्र नेमके कोठून आले, याचा शोध स्वारगेट पोलिस घेत आहेत.