Skip to content Skip to footer

फाशीची शिक्षा सुनावताच निर्भया च्या आईने हंबरडा फोडला!

अहमदनगर : “न्यायव्यवस्था, उज्ज्वल निकम यांच्यावर माझा विश्वास होता. तपास अधिकारी, पोलिस अधिकारी यांनी मनापासून तपास केला आणि माझ्या छकुलीला न्याय मिळाला,” अशी प्रतिक्रिया कोपर्डीच्या निर्भया च्या आईने दिली.

कोपर्डी बलात्कार आणि हत्या प्रकरणातील जितेंद्र शिंदे, नितीन भैलुमे आणि संतोष भवाळ या तीनही दोषींना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आहे. अहमदनगर जिल्हा सत्र न्यायालयाच्या न्यायाधीश सुवर्णा केवले यांनी हा निकाल दिला.

न्यायालयाच्या या निकालावर प्रतिक्रिया देताना निर्भाया ची आई ओक्साबोक्सी रडू लागली. “मराठी समाज, विद्यार्थी, मुख्यमंत्री, भय्यूजी महाराज यांनी खूप साथ दिली. मराठी समाज एकवटला आणि माझ्या छकुलीला न्याय मिळाला. सर्व समाजांचे, महाराष्ट्राचे मी आभार मानते,” असं निर्भयाची आई म्हणाली.

“प्रत्येक शनिवारी मला माझ्या छकुलीची आठवण येते,” असे भावुक उद्गारही आईने काढले. यावेळी त्यांना शब्दही फुटत नव्हते.

सर्व दोषींना फाशीची शिक्षा मिळाली असली तरी ते निकालाविरुद्ध हायकोर्टात दाद मागू शकतात. याविषयी विचारलं असता निर्भया ची आई म्हणाली की, “पहिली लढाई जिंकली आहे. पण न्यायासाठी आणि दोषींना फासावर लटकवण्याठी शेवटपर्यंत लढा देणार. यापुढे कोणत्याही छकुलीवर अत्याचार झाल्यास मी धावून जाईन.”

https://maharashtrabulletin.com/kopardi-rape-murder-case/

काय आहे नेमकं प्रकरण
अहमदनगर जिल्ह्यातल्या कोपर्डीमध्ये 13 जुलै 2016 रोजी अल्पवयीन मुलीवर बलात्कार करुन तिची निर्घृण हत्या करण्यात आली होती. या प्रकरणाने राज्य ढवळून निघालं होतं. या प्रकरणी पोलिसांनी नितीन भैलुमे, जितेंद्र शिंदे आणि संतोष भवाळ या तिघांना अटक करण्यात आली होती. जलदगती न्यायालयात सुनावणी करुन आरोपींना फाशी देण्याची मागणी करण्यात आली.

31 जणांच्या साक्ष
कोपर्डी खटल्यात आतापर्यंत 31 जणांच्या साक्ष नोंदवण्यात आल्या आहेत. सप्टेंबर महिन्यात सर्व साक्षीदारांच्या साक्षी पूर्ण झाल्या आहेत. याप्रकरणी जितेंद्र शिंदे, संतोष भवाळ आणि नितीन भैलुमे यांच्यावर कटकारस्थान करुन बलात्कार आणि हत्याचा आरोप ठेवण्यात आला आहे.

कोपर्डी बलात्कार आणि हत्येचा घटनाक्रम

13 जुलै 2016
रोजी सायंकाळी साडेसातच्या दरम्यान पीडितेवर अमानुष अत्याचार करुन हत्या

15 जुलै 2016
जितेंद्र शिंदेला श्रीगोंद्यात अटक

16 जुलै 2016
संतोष भवाळला अटक

17 जुलै 2016
तिसरा आरोपी नितीन भैलुमे अटकेत

18 जुलै 2016
दोन आरोपींवर जिल्हा न्यायालय परिसरात हल्ला

24 जुलै 2016
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कोपर्डीला भेट

7 ऑक्टोबर 2016
तिन्ही आरोपींविरोधात जिल्हा न्यालयात दोषारोपपत्र दाखल

1 एप्रिल 2017
कोपर्डी खटल्यातील तिन्ही आरोपींवर शिवबा संघटनेच्या कार्यकर्त्यांकडून जिल्हा न्यायालयाच्या आवारात हल्ला

22 जून 2017
खटल्यात सरकारी पक्षाने एकूण 31 साक्षीदार तपासले

2 जुलै 2017
कोपर्डीत सूर्योदय संस्थेच्यावतीने निर्भयाचं स्मारक बांधण्याच निर्णय

12 जुलै 2017
कोपर्डी घटनेच्या एक वर्षाच्या पूर्वसंध्येला नगरला कॅण्डल मार्च

13 जुलै 2017
घटनेला एक वर्ष पूर्ण झाल्याने निर्भयाला श्रद्धांजली अर्पण

9 ऑक्टोबर 2017
खटल्याचा अंतिम युक्तिवाद पूर्ण

18 नोव्हेंबर 2017

तीनही आरोपी दोषी

21 नोव्हेंबर 2017

दोषी नंबर 1 जितेंद्र शिंदे आणि दोषी नंबर 3 नितीन भैलुमे यांच्या वकिलांचा शिक्षेवर युक्तीवाद, कमीत कमी शिक्षेची मागणी

22 नोव्हेंबर 2017

दोषी नंबर 2 – संतोष भवाळच्या वकिलांचा युक्तीवाद,

घटना दुर्देवी आहे, मात्र प्रत्येकाला बचावाचा, अधिकार आहे. त्यामुळे शिक्षेच्या सुनावणीवर कोणताही सामाजित दबाव नसावा, असा युक्तीवाद दोषीच्या वकिलांनी केला.

त्यानंतर सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी तीनही आरोपी प्रौढ आहेत, त्यामुळे त्यांना फाशीच द्यावी, अशी मागणी केली.

29 नोव्हेंबर 2017

जितेंद्र शिंदे, संतोष भवाळ, नितीन भैलुमे या तिन्ही दोषींना फाशी. न्यायाधीश सुवर्णा केवले यांनी सहा मिनिटांत शिक्षा सुनावली

पाहा व्हिडीओ

अधिक माहितीसाठी

Leave a comment

0.0/5