Skip to content Skip to footer

मार्क झुकरबर्ग यांच्या बहिणीसोबत छेडछाड 

वॉशिंग्टन – फेसबुकचे संस्थापक मार्क झुकरबर्ग यांची बहीण रँडी झुकरबर्ग यांनी लॉस एन्जेलिसहून मेक्सिकोला जाणाऱ्या विमानात आपल्याबरोबर छेडछाड झाल्याचा दावा केला आहे. बुधवारी सोशल मीडियावर त्यांनी यासंदर्भातील माहिती पोस्ट केली होती.

दरम्यान, प्रवाशाकडून रँडी झुकरबर्ग यांची छेडछाड होत असताना, संबंधित विमानातील अटेंडेन्टने ही घटना पाहिली नसल्याचा दावा अलास्का एअरलाईन्सने केला आहे. यासंबंधी चौकशी सुरू असल्याचे एअरलाईन्सनं सांगितले आहे. तसेच, संबंधित व्यक्ती दोषी आढळल्यास त्याच्या यात्रेसंबंधित असलेले विशेषाधिकार रद्द करण्याची कारवाई करण्यात येईल, असे एअरलाइन्सकडून सांगण्यात आले आहे.

https://maharashtrabulletin.com/kopardi-gangrape-and-murder-case-death-sentence-to-3-convicts-mothers-reaction/

सिअ‍ॅटलमधील एअरलाइनच्या अधिकाऱ्यांना रँडी यांनी लिहिलेल्या पत्रात त्यांनी म्हटले की, ”शेजारी बसलेल्या व्यक्तीमुळे आपली अत्यंत गैरसोय होत होती. कारण संबंधित व्यक्ती फर्स्ट क्लासमधील अन्य प्रवाशांवरही अश्लिल व अत्यंत खालच्या भाषेत टिप्पणी करत होता. तसेच माझ्या सहकर्मचाऱ्यांबाबतही तयाने आक्षेपार्ह विधाने केली. शिवाय विमानात येणाऱ्या महिला प्रवाशांबाबतही अश्लिल टिप्पणी करत होता”.

संबंधित व्यक्तीची फ्लाइट अटेंडेन्टकडे आपण तक्रार देखील केली होती. परंतु, याकडे दुर्लक्ष करण्यात आल्याचे त्यांनी या पत्रात म्हटले आहे.

तसेच ही बाब खासगी प्रकारे न घेण्याचा सल्ला देत, आपल्याला फक्त जागा बदलून देण्यात आल्याची माहिती रँडी यांनी दिली. ”माझे शोषण केले जात असतानाही, मी माझी जागा सोडून दुसरीकडे का म्हणून जावं”, अशी नाराजीही त्यांनी व्यक्त केली आहे.

अधिक माहितीसाठी

Leave a comment

0.0/5