Skip to content Skip to footer

बीजेपीच्या चड्डीला राष्ट्रवादीचा पट्टा दोघांनी मिळून केली जनतेची थट्टा “

अहमदनगर महानगर पालिकेत सत्ताधारी शिवसेनेला दूर ठेवण्यासाठी, भारी बहुमताने निवडून दिलेल्या शिवसेनेला सत्तेत बघायचे नगर मधील जनतेचे स्वप्न आज दोन विरुद्ध भूमिका असणाऱ्या पण शिवसेनेच्या भीतीने एकत्र झालेल्या भाजपा आणि राष्ट्रवादी पक्षाच्या नेत्यांनी अनैसर्गिक युती करून व सत्तेत येऊन नगर मधील जनतेचा रोष अंगावर ओढून घेतला आहे. एक भाजपा जो कट्टर हिंदुत्वादी पक्ष तर राष्ट्रवादी धर्मनिरपेक्षता असल्याचे वर-वर दाखविणाऱ्या, विरुद्ध दोन टोकांनी एकमेकान बरोबर आंतरजातीय विवाह केल्यासारखे दिसून येत होते. पण सर्व धर्म समभाव मानणाऱ्या राष्ट्रवादी पक्षाने भाजपा सारख्या कट्टर हिंदुत्वादी संघटनेला कसा काय पाठिंबा दिला या बद्दल राज्यात चर्चेला उधाण आलेले आहे.

राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष मा. शरद पवार यांना या छुप्या युतीच्या पाठिब्यां बद्दल माहित नाही असे वक्तव्य त्यांनी केले. पण राष्ट्रवादी पक्षात शरद पवार यांच्या शिवाय पान हालत नाहीत तेथे पक्षाचे नेते त्यांना विचारल्या शिवाय युती कशी काय करू शकतात . या वरून शरद पवार यांच्या बोलण्यात काही खरे आहे असे वाटत नाही. तसेच सिंचन घोटाळ्या वरून अजित पवार यांना टार्गेट करणारे महाराष्ट्राचे मुखयमंत्री मा. देवेंद्र फडणवीस या प्रकरणावर चूप आहे. या वरून भाजपा आणि राष्ट्रवादी यांच्यात छुपी युती झाल्याचे स्पष्ट होते. आज नगर मध्ये 68 जागा आहेत व बहुमतासाठी किमान 35चा आकडा लागणार होता. शिवसेना 24, राष्ट्रवादी 18, भाजप 14, काँग्रेस 5, बसपा 4, बाकी इतर सटरफटर एक-दोन असे संख्याबळ होते. त्यामुळे शिवसेनेचा महापौर होऊ देणे हीच लोकभावना व कौल होता. परंतु काही झाले तरी सेनेचा महापौर न बसू देण्याचे विरोधकांनी ठरविले होते. म्हणूनच राष्ट्रवादी पक्षाने बिनशर्ती पाठिंबा भाजपाला देऊन महापौर आणि उप-महापौर भाजपाचा निवडून आणला.

भाजपा नगर मध्ये सत्तेत आल्यामुळे जनतेचा किती विकास होईल माहित नाही, पण अजित पवारांची सिंचन घोटाळ्यातून निर्दोष सुटका होणार हे चित्र काही दिवसात महाराष्ट्रातील जनतेला दिसून येईल. या निवडणुकीत काँग्रेस पक्षाने तटस्थ भूमिका घेतली. भाजपा पक्षाचा कट्टर विरोधी म्हणून काँग्रेसकडे पहिले जाते. विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटीलांचा हा जिल्हा परंतु या युतीवर काँग्रेस कडून काहीही प्रतिक्रिया आलेली नाही म्हणून या युतीला काँग्रेस पक्षाचा छुपा पाठिंबा असल्याचे बोलले जाते. आज शिवसेनेची वाढती लोकप्रियता बघून आज भाजपा-राष्ट्रवादी-काँग्रेस एकत्र आल्याचे चित्र महाराष्ट्रात दिसून येत आहे.

Leave a comment

0.0/5