Skip to content Skip to footer

अभिनंदन यांचे आई वडील एअरपोर्टवर आल्यावर टाळ्यांचा कडकडाट आणि कडक सॅल्यूट

: भारताच्या वायु दलाचे एअर कमांडर अभिनंदन वर्तमान हे पाकिस्तानच्या ताब्यात आहेत. थोड्याच वेळात त्यांना भारताच्या ताब्यात सुपूर्द करण्यात येणार आहे. अभिनंदन मायदेशी परतणार याचा आनंद साऱ्या देशाला आहे. त्यांनी भरत यावे यासाठी देशभरातून मागणी होत होती. भारत सरकारनेही कोणत्याही अटीविना धक्का न पोहोचवता अभिनंदन यांना भारतात द्यावे अशी तंबीच पाकिस्तानला दिली. जिनिव्हा करारानुसार आंतरराष्ट्रीय पातळीवरूनही पाकिस्तानवर दबाव वाढू लागला. अखेर अभिनंदन यांना भारतात पाठवण्या संदर्भातील घोषणा त्यांचे पंतप्रधान इम्रान खान यांनी केली.

आज भारतभरात तसेच खास करुन वाघा बॉर्डरवर आनंदाचे वातावरण आहे. सर्वजण अभिनंदन यांची एक झलक पाहण्यास उत्सूक आहेत. अशावेळी एका दाम्पत्याला विमानातील सहप्रवाशांनी जोरदार सॅल्यूट केला. हे दाम्पत्य दुसरे तिसरे कोणी नसून अभिनंदन यांना जन्म देणारे माता पिता होते. अशा धैर्यवान, कर्तबगार जवानाला जन्म दिल्याचा आदर प्रत्येकाच्या डोळ्यात दिसत होता.

: चेन्नईहून दिल्लीला जाणारे विमान अर्ध्या रात्री गंताव्य ठिकाणी थांबले तेव्हा कोणीच बाहेर जाण्यासाठी घाई केली नाही. कारण सर्वांच्या नजरा भारतीय वायुसेनेचे कर्तबगार एअर कमांडर अभिनंदन यांच्या आई वडीलांकडे होत्या. एअर मार्शल (सेवानिवृत्त) एस वर्तमान आणि डॉ. शोभा वर्तमान यांच्या सन्मानार्थ उपस्थित प्रवाशांनी सॅल्यूट केला तसेच टाळ्यांच्या कडकडाटासह त्यांना सर्वात आधी उतरण्याचा मान दिला.

दुपारी 4 वाजेपर्यंत अभिनंदन हे भारतात पोहोचण्याची शक्यता आहे. आपल्या मुलाला घरी नेण्यासाठी अभिनंदनचे माता पिता अमृतसरच्या दिशेने जाण्यासाठी दिल्लीमध्ये पोहोचले. त्यावेळी मान झुकवून सर्वांनी त्यांना अभिवादन केले. विमान रात्री उशीरा दिल्ली विमान तळावर पोहोचले. दिल्लीत पोहोचल्यानंतर तात्काळ वर्तमान दाम्पत्य अमृतसरसाठी रवाना झाले. ते आता वाघा बॉर्डरवर मुलाच्या स्वागतासाठी सज्ज झाले आहेत.

किस्तानच्या विमानाचा पाठलाग करत मिग 21 घेऊन उड्डाण करणारे अभिनंदन पाकच्या हद्दीत पोहोचले. मिग 21 ला अपघात झाल्यानंतर त्यांनी पॅराशूटचा वापर करत उड्डाणाचा प्रयत्न केला. पण ते पाकव्याप्त काश्मीरमध्ये पोहोचले. तिथल्या स्थानिकांच्या रोषाला त्यांना सामोरे जावे लागले. त्यानंतर पाकिस्तानच्या सैन्याने त्यांना आपल्या ताब्यात घेतले. दुसऱ्या महायुद्धापासून अभिनंदन यांचा परिवार वायु सेनेत सेवा करत आहे.

अभिनंदन यांच्या वडिलांना परम विशिष्ट सेवा पदका सहीत अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. अभि जिवंत आहे, जखमी नाही आहे. शुद्धीत आहे. त्याच्या बहादुरीच्या बोलण्यावरून हे समजत आहे. तो एक खरा सैनिक आहे. आम्हाला त्याच्यावर खूप गर्व असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

Leave a comment

0.0/5