Skip to content Skip to footer

दहशतवाद्यांचे मृतदेह आम्ही पाहिले; प्रत्यक्षदर्शीचा दावा

वृत्तसंस्था

इस्लामाबाद : भारतीय हवाई दलाने केलेल्या कारवाईत ‘जैश-ए-मोहम्मद’च्या तळावर असलेल्या चार इमारती नष्ट करण्यात आल्याची माहिती समोर आली. मात्र, आता हवाईदलाच्या कारवाईनंतर घटनास्थळावरून सुमारे 30 हून अधिक दहशतवाद्यांचे मृतदेह रुग्णवाहिकेमधून बाहेर आणण्यात आले, असा दावा येथील काही प्रत्यक्षदर्शींनी केला आहे.

26 फेब्रुवारीला पहाटे भारतीय हवाई दलाकडून एअरस्ट्राइकची कारवाई करण्यात आली. यामध्ये बालाकोट येथील जैश-ए-मोहम्मदचा तळ उद्धवस्त केले गेले. हवाई दलाच्या या कारवाईत नेमकी किती हानी झाली किंवा किती दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला, याबाबतची माहिती समोर आली नव्हती. मात्र, आता भारतीय हवाईदलाने केलेल्या एअर स्ट्राइकनंतर काही वेळाने घटनास्थळावरून 30 हून अधिक दहशतवाद्यांचे मृतदेह रुग्णवाहिकेतून बाहेर नेण्यात आले.

तसेच या कारवाईत ठार झालेल्यांमध्ये पाकिस्तानी सैन्यातील काही लोकांचा समावेश आहे, असा दावा काही प्रत्यक्षदर्शींनी केला आहे.

Leave a comment

0.0/5