Skip to content Skip to footer

गॅस गिझर वापरताय? सावधान !!!

आजकाल एलपीजी गॅस सिलिंडर वर चालणारे गॅस गिझर सर्वत्र वापरले जातात.पण गेले काही दिवसात याच गॅस गिझरच्या वापराने अनेक जीवावर बेतणारे अपघात होताना दिसत आहेत.
प्रामुख्याने घरातील महिला बाथरूम मध्ये अंघोळ करताना बेशुद्ध होऊन पडतात. साधारण महिना भरपूर्वी माझी पत्नी देखील अशाच प्रकारे बाथरूम मध्ये बेशुद्ध होऊन पडली होती घरात माझा मुलगा होता त्याने खूप वेळ झाला आई बाहेर आली नाही म्हणून हाका मारल्या पण आतून प्रतिसाद आला नाही म्हणून त्याने बाथरूमचे दार तोडून तिला बाहेर काढले. आमच्या फॅमिली डॉक्टरांना बोलावले. ती पूर्णपणे बेशुद्ध असल्याने काय झाले हे आम्हा कुणालाच समजेना, डॉक्टरांनी तिला मोकळ्या हवेत ठेवून औषधोपचार केल्यानंतर तीला शुद्ध आली .डॉक्टर भोकरेंनी तेव्हा आम्हाला सांगितले की बाथरूम मध्ये गॅस गिझर खूप वेळ चालू राहिल्या मुळे तेथील ओक्सिजन चे प्रमाण खूप कमी झाले म्हणून ती पुरेश्या ओक्सिजन अभावी बेशुद्ध पडली. त्यांच्या कडे शा किमान 7/8 केसेस आल्या होत्या. या सर्व अपघातांचा घटनाक्रम आरखाच आढळून येत आहे.
बहुतांश घरातील महिला रविवारी अथवा सुटीच्या दिवशी सकाळी घर आवरायला काढतात त्यामुळे साहजिकच त्यांच्या अंघोळीला उशीर होतो आणि सर्वच महिला सुटीच्या दिवशी जास्त वेळ आणि केसांवर पाणी घेऊन अंघोळ करतात.अंघोळीच्या आधी बाथरूम साफ करणे आणि थोडेफार कपडे धुणे हेही होत असतेच. या शारीरिक कामांमुळे साहजिक दम लागून शरीराची ओक्सिजन ची गरज वाढलेली असते आणि दुसऱ्या बाजूला अंघोळीसाठी गॅस गिझर खूप वेळ सुरू ठेवला जातो. त्यातील गॅस च्या ज्वलनाने कार्बनडाय ऑक्साईड हा प्रक्रिया वायू तयार व्हायला हवा असतो परंतु बहुतांश बाथरूम मध्ये पुरेसे व्हेंटिलेशन नसते , एकझोस्ट फॅन लावलेला नसतो.गरम पाण्याच्या बाष्पामुळे पण बाथरूम मध्ये ऑक्सिजनचे प्रमाण खूप कमी झालेलं असते आणि त्यामुळे गॅस ज्वलनासाठी पुरेसा ओक्सीजन मिळत नाही आणि अश्या प्रक्रिये मुळे कार्बनडाय ऑक्साईड ऐवजी कार्बन मोनॉऑक्साईड नावाचा अत्यंत घातक वायू तयार होतो.कार्बन मोनॉक्साईड ला सायलेंट किलर मानले जाते.त्याच्या श्वसनाने आधी आपली शुद्ध हरपते आणि नंतर मृत्यू देखिल होऊ शकतो.आगीच्या घटनांमध्ये गुदमरून होणारे मृत्यू हे बहुतांश वेळा या कार्बन मोनॉक्साईड मुळेच होतात.
माझ्या घरीच घडलेला हा प्रसंग खरंतर मी त्याच वेळी लिहून पाठवणार होतो परंतु नाही जमले.परवा परत माझ्या परिचित कुटुंबातील महिला देखील अशाच प्रकारे बेशुद्ध पडली होती , तिची अवस्था जास्त गंभीर होती 3 दिवस अतिदक्षता विभागात तिला राहावे लागले.यामुळे असे अपघात टळावे किमान असे अपघात होतात हे सर्वांना समजावे म्हणून हे सर्व लिहून काढले.
गॅस गिझर शक्यतो बाथरूम च्या बाहेरच लावा. अगदीच अशक्य असेल व्हेंटिलेशन व्यवस्थित ठेवा, एजोस्ट फॅन नक्की सुरू करा त्यामुळे विषारी वायू बाथरूम बाहेर जायला मदत होईल. महिलांनी या बाबतची विशेष काळजी घ्या.
अत्यंत घातक आणि क्षुल्लक गोष्टीसाठी जीवावर बेतू शकणारा प्रकार आहे हा त्यामुळे योग्य ती काळजी घ्या. हा लेख आपल्या नातेवाईक आणि मित्रांना नक्की पाठवा, त्यांनाही या माहितीचा उपयोग होईल.

Leave a comment

0.0/5