Skip to content Skip to footer

भारतावर बॉम्ब हल्ले करण्यासाठी आम्ही ‘मसूद’चा वापर केला ; पाकिस्तान तोंडघशी

पाकिस्तानचे माजी अध्यक्ष जनरल परवेझ मुशर्रफ यांनी जैश-ए-महंम्मद या दहशतवादी संघटनेबाबत एक खळबळजनक खुलासा केला आहे. ‘माझ्या कारकिर्दीत ‘जैश’चा म्होरक्या मसूद अजहर याचा वापर भारतावर बॉम्ब हल्ले करण्यासाठी करण्यात आला होता’, असे मुशर्रफ यांनी म्हटले आहे. पाकिस्तानी पत्रकार नदीम मलिया यांनी परवेझ मुशर्रफ यांची फोनवर मुलाखत घेतली. त्यात त्यांनी ही धक्कादायक माहिती दिली. त्यांच्या या गौप्यस्फोटामुळे पाकिस्तान सरकार तोंडघशी पडले आहे.

दोन मिनिटांच्या या मुलाखतीची ऑडिओ क्लिप मलिक यांनी ५ मार्च रोजी आपल्या ट्विटर हँडलवरुन प्रसिद्ध केली आहे. या मुलाखतीत मुशर्रफ यांनी जैशवर करण्यात आलेल्या कारवाईचेही समर्थनही केले आहे. याच संघटनेने आपल्याला ठार मारण्याचा प्रयत्न केल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. मुशर्रफ म्हणाले की, मी आधीपासूनच जैशला दहशतवाद्यांची संघटना म्हणत होतो. या संघटनेने ठार मारण्याचा प्रयत्न केला होता. त्यांच्यावर कारवाई झालीच पाहिजे. सरकार या संघटनेविरोधात कारवाई करत असल्याचा आपल्याला आनंद असल्याचे म्हचले आहे. ही कारवाई याआधीच व्हायला हवी होती.’

तुमच्या काळत ‘जैशे’वर कारवाई का केली नाही?

दरम्यान, तुमच्या काळत ‘जैश’वर कारवाई का केली नाही? असा प्रश्न विचारल्यावर मात्र मुशर्रफ यांनी त्यावेळची गोष्ट वेगळी होती असे सांगितले. तेसच त्यावेळी पाकिस्तानची गुप्तचर संस्था ‘आयएसआय’ भारतावर बॉम्ब हल्ले करण्यासाठी ‘जैश’चा वापर करत असल्याचे खळबळजनक खुलासा त्यांनी केला.असे सांगताना मात्र मुशर्रफ यांनी भारतालाच आरोपी ठरवले आहे. भारताकडून पाकिस्तानात हल्ले केले जात होते आणि त्यांना उत्तर देण्यासाठी आपण भारतात हल्ले घडवून आणत होतो.

मुशर्रफ यांनी लष्करशाहीचा वापर करत १९९९ मध्ये नवाझ शरीफ यांना पंतप्रधान पदावरून हटवले होते व स्वतः राष्ट्रपती बनले होते. मात्र, त्यांना नऊ वर्षांनी सत्ता गमवावी लागली होती. यानंतर ते संयुक्त अरब अमिरातीमध्ये राहत आहेत. डिसेंबर २००३ मध्ये पाकिस्तानचमध्ये मुशर्रफ यांच्या ताफ्यावर दहशतवादी हल्ला झाला होता. यामध्ये ते थोडक्यात बचावले होते.

 

Leave a comment

0.0/5