Skip to content Skip to footer

बारामतीत पत्रकार संघातर्फे महिलांचा सन्मान

जळोची- बारामतीत जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ, बारामती तालुकाच्या वतीने कर्तृत्ववान व कार्यशील महिलांचा सत्कार बारामती नगरीच्या महिला नगराध्यक्षा पोर्णिमा तावरे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी नूतन उपनगराध्यक्ष नवनाथ बल्लाळ उपस्थितित होते. सुनीता शिंदे यांचा महिला समपुदेशकच्या माध्यमातून सातशेच्या आसपास जोडपे जोडण्याचे काम, कौटुंबिक हिंसाचार यातील प्रकरणास न्याय दिल्याबद्दल, वैशाली अकिवाटे यांना शहरी महिला बचत गट जोडणे, व्यायसायिक कर्ज मिळवून दिल्याबद्दल, अमृता भोईटे यांना आठशे शाळांना भेट देऊन मुलींना संरक्षणाचे मार्गदर्शन करण्याबाबत आणि साडेतीनशे रोडरोमिओवर कारवाई केल्याबद्दल, स्नेहा गिते यांचा सरपंच संघटनेच्या तालुक्‍याच्या महिला अध्यक्ष म्हणून, दीपाली सांवत यांचा डिझाईन वर्ल्डमध्ये कलाकौशल्य असल्याने, कांचन भोसले यांनी स्वतःची किडणी दान केल्याबद्दल, शशिकला वाबळे यांची कृर्षी उत्पन्न बाजार समितीच्या उपसभापतीपदी नियुक्ती झाल्याबद्दल, तसेच बारामती नगरपरिषदेच्या बांधकाम समिती सभापदी मयुरी शिंदे, महिला बाल कल्याण सभापती शारदा मोकाशी, पाणी पुरवठा सभापती अनिता जगताप, शिक्षण समिती सभापती अश्विनी गांलिंदे, महिला बाल कल्याण उपसभापती रुपाली गायकवाड यांची नियुक्ती झाल्याबद्दल ट्रॉफी, शाल आणि झाडाचे रोपटे देऊन सन्मान करण्यात आला.

यावेळी महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ बारामती तालुका अध्यक्ष संतोष जाधव यांच्यासह राजू कांबळे, अनिल पोटरे, फिरोज शेख, मन्सुर शेख, सुनील शिंदे, बापू शेंडगे, उमेश दुबे, शहाजी शिंदे,लक्ष्मण भिसे, दीपक पडकर, स्वप्निल कांबळे, विराज शिंदे, योगेश नालदे,संतराम घुमटकर, संजय कांबळे, राजेश वाघ, रामभाऊ तावरे, भीमसेन जाधव, प्रवीण जाधव, सचिन वाघ, संतोष शिंदे यांसह पत्रकार बाधंवाच्या वतीने हा कार्यक्रम पार पाडला.

Leave a comment

0.0/5