एमपीसी न्यूज – लग्नाचे आमिष दाखवून 17 वर्षीय मुलीवर अत्याचार केला. याप्रकरणी एका युवकाला दिघी पोलिसांनी अटक केली आहे.
याप्रकरणी पीडितेने दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. सोहेल गुलाब शेख (वय 20, रा. लोहगाव, पुणे) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने पीडितेला लग्नाचे आमिष दाखवून तिच्या इच्छेविरुद्ध शारिरीक संबंध ठेवत तिला गर्भवती केले. यावरून पोलिसांनी सोहेल याला अटक केली आहे. याचप्रमाणे 18 वर्षीय मुलीने दिघी पोलीस ठाण्यात अशीच एक तक्रार दिली असून किरण शंकर दिवटे (वय 20, रा. मोशी) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. किरण यानेही पिडीतेला लग्नाचे आमिष दाखवून जबरदस्ती केली होती. या दोन्ही प्रकरणाचा दिघी पोलीस तपास करीत आहेत