Skip to content Skip to footer

साताऱ्याच्या दोन राजेंची झाली दिलजमाई..! उदयनराजे म्हणतात, शिवेंद्रराजे बैठकीत हसत होते

मुंबई | सातारा लोकसभेची उमेदवारी निश्चित करण्यासाठी मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांची शरद पवारांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली होती. या बैठकीत सातारा लोकसभेसाठी छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आलंय.

बैठक संपल्यानंतर माध्यमांनी उदयनराजेंबरोबर संवाद साधला. शिवेंद्रराजे बैठकीत हसत होते, असं उदयनराजे यांनी म्हटलं आहे. शरद पवार यांच्या शिष्टाईला यश आलं आहे, सध्या तरी असंच म्हणावं लागेल.

तर दुसरीकडे उदयनराजेंची प्रसारमाध्यमांसमोर मुलाखत सुरू असताना शिवेंद्र राजे निघून गेले आणि म्हणाले आम्हांला आता कार्यकर्त्याना सांगावं लागेल.

मी नाराज नाही. पक्षाच्या उमेदवाराचं आपण 100% काम करू, असं शिवेंद्रराजे बैठक संपल्यानंतर म्हणाले.

Leave a comment

0.0/5