Skip to content Skip to footer

अखेर शरद पवारांचा आदेश आला कामी; उदयनराजेंबाबत घेतला ‘हा’ निर्णय

मुंबई : राष्ट्रवादीचे खासदार उदयनराजे भोसले व आमदार शिवेंद्रराजे भोसले यांच्यात मनोमिलन करण्यात पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांना अखेर यश आले. सातारा लोकसभेसाठी उदयनराजेच उमेदवार राहतील. त्यासाठी सर्व आमदार व स्थानिक पदाधिकारी त्यांना मदत करतील, असा आदेशच पवार यांनी दिला आहे. त्यांच्या आदेशाला सर्वांनीच सहमती दर्शवली.

आज पवारांनी राष्ट्रवादीच्या नेत्यांची खासदार व आमदारांसोबत बैठक घेतली. उदयनराजे यांच्या उमेदवारीला शिवेंद्रराजेसह इतर स्थानिक नेत्यांचा विरोध होता. मात्र, नेहमीप्रमाणे शरद पवार यांनी त्यांची नाराजी दूर करण्यात यश मिळवले.

मावळमधून पार्थ पवारच

मावळ लोकसभा मतदारसंघातून अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. शरद पवार यांनी पार्थ निवडणूक लढवणार नसल्याचे या अगोदर जाहीर केले होते. मात्र, राष्ट्रवादीच्या सर्वच स्थानिक नेत्यांनी पार्थ पवार हेच सक्षम उमेदवार होवू शकतात असा आग्रह केला. त्यामुळे पार्थ हे मावळ लोकसभेचे राष्ट्रवादीकडून उमेदवार राहतील, हे निश्चित झाले आहे.

Leave a comment

0.0/5