Skip to content Skip to footer

मनसे आमदार शरद सोनावणे यांचा शिवसेना पक्षात प्रवेश….

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे एकमेव आमदार शरद सोनावणे यांनी सोमवार दि. ११ मार्च रोजी आपल्या असंख्य कार्यकर्त्यांसह पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हातातून शिवबंधन बांधून शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला आहे. सकाळीच जुन्नर तालुक्यातून आपल्या हजारो समर्थकांसह १००० गाडयांचा ताफा घेऊन आमदार सोनावणे मुंबई येथील शिवसेना भवन येथे येण्यासाठी निघाले होते. त्यामुळे शिवसेना पक्षाने मनसेचा सर्जिकल स्ट्राईक केलेला आहे अशीच बातमी सध्या राजकीय वर्तुळात बोलली जात आहे. आमदार शरद सोनावणे यांना पक्ष सोडण्याबद्दल विचारले असता खेडे-पाडयातील जनतेची समस्या सोडविण्यासाठी आपण शिवसेना पक्षात प्रवेश केल्याचे सांगण्यात आलेले आहे.

काही दिवसापूर्वी मुंबई महानगर पालिकेतील मनसे पक्षाच्या सात नगरसेवकांनी पक्षाला राम-राम ठोकून शिवसेना पक्षात प्रवेश केला होता. आता मनसेचे एकमेव आमदार असलेले सोनावणे यांनी सुद्धा शिवसेना पक्षात प्रवेश करून मनसेला अडचणीत आणलेले आहे. राज ठाकरे यांनी ९ मार्च मनसे वर्धापन दिनी आपली लोकसभेच्या निवडणुकीसाठी राजकीय भूमिका स्पष्ट करतील असेच मनसे कार्यकर्त्यांना वाटत होते. परंतु आपल्या भाषणात लोकसभा निवडणुकी बद्दल काहीही भूमिका न मांडल्यामुळे अनेक नाराज कार्यकर्त्यांनी मनसे पक्षाला कायमचा राम-राम ठोकला होता. त्यामुळे आज मनसे पक्षाचा एकही उमेदवार हा सत्तेत राहिलेला नाही आहे.

जुन्नर तालुक्यातील शरद सोनावणे यांचा पक्ष प्रवेशामुळे येणाऱ्या आगामी लोकसभा निवडणुकीला खा. शिवाजीराव पाटील हे जास्त मताने शिऊर मतदार संघातून निवडून येतील अशीच चर्चा सध्या राजकीय वर्तुळात रंगत असताना दिसत आहे. आज जुन्नर तालुक्यात सोनावणे यांच्या प्रवेशाने जुन्नर मध्ये शिवसेना पक्षाची ताकत अजून वाढलेली आहे. आज झालेल्या पक्षप्रवेश कार्यक्रमाला पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या बरोंबर खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, शिवसेना आमदार नीलम गोऱ्हें, दीपक सावंत आणि जुन्नर तालुक्यातील असंख्य शिवसैनिक उपस्थित होते.

Leave a comment

0.0/5