राज्याचे नगर विकास मंत्री तथा ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांना काहीच दिवसापूर्वी कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले होते. या संदर्भातील माहिती सिंदे यांनी ट्विटरच्या माध्यमातून दिली होती.
त्यानंतर त्यांच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मात्र उपचार घेत असतानाही एकनाथ शिंदे रुग्णालयातूनजनसेवेचे कामे सुरूच आहेत..
याबाबतची माहिती त्यांनी ट्विटद्वारे दिली आहे. कोरोना संसर्ग झाल्यानंतर रुग्णालयात उपचार घेत असून कोणत्याही प्रकारची लोकोपयोगी कामे माझ्यामुळे अडून राहू नये म्हणून रुग्णालयातूनच कामाला सुरुवात करत आहे. यावर ट्विट करत म्हटले आहे की, “आपल्या सर्वांच्या प्रार्थना,आशीर्वाद व शुभेच्छांमुळे माझी तब्येत सुधारत असून लवकरात लवकर प्रत्यक्ष जनसेवेकरिता हजर होईन, असे ट्विट त्यांनी केले आहे.
#कोरोना संसर्ग झाल्यानंतर रुग्णालयात उपचार घेत असून कोणत्याही प्रकारची लोकोपयोगी कामे माझ्यामुळे अडून राहू नये म्हणून रुग्णालयातूनच कामाला सुरुवात करत आहे. आपल्या सर्वांच्या प्रार्थना,आशीर्वाद व शुभेच्छांमुळे माझी तब्येत सुधारत असून लवकरात लवकर प्रत्यक्ष जनसेवेकरीता हजर होईन. pic.twitter.com/44xmj8FoLu
— Eknath Shinde – एकनाथ शिंदे (@mieknathshinde) September 30, 2020