गया – बोधगयामध्ये एक असे कब्रस्तान आहे जेथे फक्त प्राण्यांना दफन केले जाते. ज्याचे निर्माण बेवारस जनावरांना आपले जीवन मानणाऱ्या इटलीच्या एड्रियाना फ्रेंटी यांनी केले आहे. यासाठी त्यांनी अंदाजे 7200 चौरस फूट जमीन विकत घेतली. जनावरांसाठी, त्याने आपल्या घराला हॉस्पिटल देखील बनवले आहे. जेथे बेवारस प्राणी, विशेषत: रस्त्यावरील कुत्र्यांवर उपचार केले जातात.
एड्रियाना फ्रेंटी 1982 साली इटलीहून बोधगया येथे भारत फिरण्यासाठी आली होती. येथील संस्कृती पाहून प्रभावित होत, त्यांनी बौद्ध धर्म स्वीकारला. 1991 मध्ये बोधगयातील ग्रामीण भागातील आपल्या प्रवासादरम्यान त्यांनी पाहिले की एका बेवारस कुत्र्याचा मृतदेह नदीच्या काठावर फेकण्यात आला. हे पाहून, त्यांनी प्राण्यांवर उपचार करण्याचे आणि त्यांचे सन्मानाने दफन करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर त्यांनी धंधवा गावाच्या रस्त्यावर जमीन विकत घेतली आणि प्राण्यांसाठी हॉस्पिटल उघडले.
1992 पासून जनावरांचे हे कब्रस्तान अस्तित्वात आहे. कब्रस्तानात प्राण्यांचे दफन केल्यानंतर, त्यांना ओळखण्यासाठी एक नामफलक देखील लावला जातो, ज्यावर त्यांच्या नावाचा उल्लेख आणि त्यांच्या मृत्युच्या तारखेचा उल्लेख केलेला असतो. धार्मिक विधी नंतर प्राण्यांची शरीरे दफन केली जातात. त्यांचे पार्थिव खांदा देऊन संस्थेत बनलेल्या बुद्ध स्तूपात आणले जाते. त्यानंतर त्यांच्यावर पाच परिक्रमा केल्या जातात. संस्थेमध्ये तीन किंवा पाच कक्षे केली जातात. मागील 27 वर्षात गाय, कुत्रा, शेळी, चिकन, मासे, कासव, ससे, झाडांवरून पडून मेलेल्या तीन हजारहून जास्त पक्षी, प्राण्यांना या दफनभूमी दफन कररण्यात आले आहे.
जनावरांचे संरक्षण करणाऱ्या एड्रियाना फेंटी यांच्या संस्थेतील कर्मचारी ग्रामीण आणि शहरी भागातील बेवारस जनावरांना घेऊन येतात आणि त्यांच्या रुग्णालयात त्यांच्यावर ईलाज केला जातो. त्याचबरोबर गरज पडल्यास तज्ञ डॉक्टरांच्या मदतीने देखील त्यांच्यावर शस्त्रक्रिया केली जाते. त्या जनावराला पूर्णपणे बरे होईपर्यंत येथे ठेवले जाते. त्यानंतर त्या जनावराला जेथून आणले तेथे सोडले जाते.