Skip to content Skip to footer

२६ एप्रिल रोजी मोदी घेणार पत्रकार परिषद…

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे येत्या शुक्रवारी म्हणजेच २६ एप्रिलला त्यांचा मतदार संघ वाराणसीत पत्रकार परिषद घेणार आहेत. गेल्या ५ वर्षातील त्यांची ही पहिलीच पत्रकार परिषद असणार आहे. दुपारी १२.३० वाजता ही पत्रकार परिषद होणार आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी हे २६ एप्रिलला वाराणसीतून उमेदवारी अर्ज भरणार आहेत. त्या दिवशी वाराणसीत मोदी मोठी रॅली काढत शक्तीप्रदर्शन करतील. या रॅलीनंतर पंतप्रधान वाराणसीतील ताज गंगा या पंचतारांकित हॉटेलात पत्रकार परिषद घेतील असे समजते.आता पर्यंत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कधीही पत्रकार परिषद घेतलेली नाही आहे.

२०१९ च्या लोकसभा निवडणुकीच्या अंतिम टप्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी देशातील जनतेला कसे संबोधतात आणि पत्रकार परिषदेला कशी उत्तरे देतात याच कडे साऱ्या देशाचे लक्ष लागले आहे. भाजपा युतीचे सरकार आल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतलेल्या निर्णयात्मक भूमिकेमुळे साऱ्या विरोधकांचे टीकेचे धनी मोदी बनले होते परंतु या विषयी विरोधकांना कधीच पत्रकार परिषद घेऊन उत्तरे दिलेली नव्हती. परंतु २६ एप्रिल रोजी होणाऱ्या पत्रकार परिषेदेत मोदी देशातील जनतेच्या सर्वच प्रश्नांची उत्तरे देऊन, तसेच आपल्या विरोधाकांना सुद्धा सडेतोड उत्तरे देतील. या पत्रकार परिषदेतून मोदी आपण केलेल्या कामगिरीचा लेखाजोखा जनतेपुढे मांडतील.विविध आरोप,जनतेला पडलेले प्रश्न या सर्वांची मोदी नेमकी काय उत्तरं देतात हे लवकरच स्पष्ट होईल

Leave a comment

0.0/5