Skip to content Skip to footer

फेसबुकवर प्रश्न मंजुषेच्या नावाखाली लोकांच्या प्रोफाईल डेटाची चोरी

फेसबुकवर प्रश्न मंजुषेच्या नावाखाली हजारो लोकाचा प्रोफाईल डेटा चोरी करण्यात आला असल्याचं समोर आलं आहे, असं खुद्द फेसबुकनेच सांगितलं आहे.

प्रश्न मंजुषेत भाग घेण्यासाठी फेसबुक युजर्सला browser extensionsची विनंती करण्यात येत होती. त्यानंतर त्यांचं नाव, फोटो, फ्रेंड लिस्टची माहिती गोळा करण्यात येत होती.

2016 ते ऑक्टोबर 2018 पर्यंत 63 हजार वेळा असं झाल्याचं, फेसबुकने सांगितलं आहे.

युक्रेनच्या अँड्रे गोर्बाचेव्ह आणि ग्लेब स्लचेव्हस्की यांना फेसबुकने कोर्टात खेचलं आहे. ते दोघजण Web Sun Group साठी काम करत होते.

“तुमच्या डोळ्यांचा रंग तुमच्याविषयी काय सांगतो?” लोक तुमच्या सुंदरतेवर प्रेम करतात की तुमच्या बुद्धीमत्तेवर? अशा मथळ्याखाली या प्रश्न मंजुषा होत्या. त्यात सहभाग घेतला की फेसबुकद्वारे तिसऱ्या अॅपवर लॉगिन केलं जायचं.

असं करण पूर्णपणे सुरक्षित होतं पण चुकीच्या मथळ्याखाली लोकांच्या माहितीची चोरी केली जायची. अशा प्रश्न मंजुषेमुळे 63 हजार ब्राऊजर्समधून माहिती गोळा करण्यात आली आहे. या प्रकारामुळे फेसबुकला 75 हजार डॉलर्सचं नुकसान झालं आहे, असं कंपनीनं कोर्टात सांगितलं.

त्या दोघा जणांनी अमेरिकेच्या काँप्युटर हॅकिंगविरोधी कायद्याचं आणि फेसबुकच्या अटी-नियमांचं उल्लंघन केल आहे, असं कंपनीचं म्हणणं आहे.

Leave a comment

0.0/5