Skip to content Skip to footer

FBIच्या साहाय्याने NIAचा पुलवामा हल्ल्याच्या कारस्थानाचा छडा

जम्मू कश्मीरमध्ये पुलवामा येथे झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्यासंदर्भात राष्ट्रीय अन्वेषण संस्थेने (एनआयए) कसून तपास सुरू केला आहे. त्यासाठी एनआयए अमेरिकेची तपास यंत्रणा एफबीआयची मदत घेत आहे.

आजतकने दिलेल्या वृत्तानुसार, एनआयए अमेरिकेच्या एफबीआय या तपास संस्थेच्या साहाय्याने जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्यांद्वारे वापरण्यात येणाऱ्या नव्या पद्धतीच्या चॅटिंग अॅप्लिकेशन आणि त्याच्यात झालेल्या चॅटच्या तपशीलांचा तपास करत आहे. एनआयएला पुलवामा हल्ल्याचा मास्टरमाईंड मुदस्सिर नवनव्या चॅटिंग अॅप्लिकेशनच्या माध्यमातून पाकिस्तानात असलेल्या दहशतवाद्यांशी संपर्कात होता, अशी माहिती मिळाली आहे.

मुदस्सिरला पाकिस्तानातून कश्मीरमध्ये हल्ले करण्यासाठीचे निर्देश मिळत होते. यासंबंधीची सर्व माहिती सांकेतिक स्वरुपात एनआयएला उपलब्ध झाली आहे. त्या माहितीच्या आधारे एनआयए आणि एफबीआय या दोन्ही संस्था या सांकेतिक भाषेला उलगडण्याचा प्रयत्न करत आहेत. मुदस्सिरशी संपर्कात असलेले जैशचे सहाहून अधिक दहशतवादी एनआयएच्या रडारवर आहेत. तसंच कश्मीरवरचं हल्ल्याचं सावट अद्याप कायम असल्याचंही एनआयएचं म्हणणं आहे.

Leave a comment

0.0/5