सिनेअभिनेता सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरणी सुरु असलेल्या चौकशी दरम्यान मुंबई पोलिसांनी टीआरपी घोटाळा उघडीस आणला होता. त्यातच आर. रिपब्लिक चॅनेलच्या पत्रकारांनी मुंबई पोलीस आयुक्त यांचे पोलीस खात्यात कोणीही ऐकत नाही, अशी चुकीची माहिती पत्रकार माध्यमांमध्ये पसरवली होती. त्या विरोधात आता ना.म. जोशी पोलीस स्थानकात रिपब्लिकच्या त्या कर्मचाऱ्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
मुंबईतील ना. म. जोशी पोलीस स्थनाकाचे पोलीस उपनिरीक्षक शशिकांत पवार यांनी या प्रकरणी तक्रार दाखल केलेली आहे. ही तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी रिपब्लिक टीव्हीच्या संपादकीय विभागातील कर्मचाऱ्यांविरोधात विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. त्यात डेप्युटी न्यूज एडिटर सागरिका मित्रा, अँकर आणि सिनिअर असोसिएट एडिटर शिवानी गुप्ता, डेप्युटी एडिटर शावन सेन, एक्झिक्युटिव्ह एडिटर निरंजन नारायणस्वामी आणि संपादकीय विभागातील इतर कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.