Skip to content Skip to footer

रवी राणा यांना आपली पत्नी जिकंण्याचा दांडगा विश्वास

अमरावती या अनुसुचित जातीसाठी राखीव लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकिटावर निवडणूक लढलेल्या नवनीत कौर-राणा यांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसां सोबत अर्थात भाजपसोबत जवळीक वाढली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकिटावर लढविलेल्या लोकसभा निवडणुकीत शिवसेना खासदार आनंदराव अडसूळ यांच्या कडून पराभव झाल्यानंतर त्या राष्ट्रवादीच्या कोणत्याही कार्यक्रमात चमकल्या नाही. आता पदवीधर निवडणुकीत त्यांनी भाजपला मदत करण्याचे ठरविले आहे. मात्र राष्ट्रवादी पक्षाला सोडले म्हणून त्यांनी जाहीर केले नव्हते.

काही दिवसापूर्वी नवनीत राणा-कौर यांचे पती रवी राणा यांनी राष्ट्रवादीचे शरद पवार आणि प्रफुल पटेल यांची भेट घेतलेली होती नवनीत कौरसाठी उमेदवारी दिल्यास आम्ही विजय मिळवून देऊ असे त्या दोघांनीही पटवून दिले. मात्र अमरावतीची जागा कोणी लढवायची यावर अद्याप दोन्ही काँग्रेसमध्ये एकवाक्यता न झाल्यामुळे याचा निर्णय झाल्यावरच भूमिका स्पष्ट होईल असेही जयंत पाटील म्हणाले. तसेच नावणीत कौर-राणा यांनी जमा केलेले जातप्रमाणं पत्र हे सुद्धा कोर्टाने खोटे ठरविले होते. त्यामुळे नवनीत कौर-राणा यांच्या अडचणीत वाढ झालेली दिसून येत होती.

सदर जागा ही नवनीत कौर-राणा यांना सोडल्यास राष्ट्रवादीचे कार्यकर्ते त्यांचा प्रचार करणार नाही असे सुद्धा बोलून दाखवले होते. २०१४ च्या निवडणुकी नंतर कौर हे भाजपा पक्षाच्या कार्यक्रमाला जास्त दिसून येत होते त्यामुळे येणाऱ्या लोकसभा निवडणुकीला त्या भाजपा पक्षातून निवडणुकीला उतरणार अशा चर्चा सुद्धा अमरावती जिल्ह्यात चालूच होत्या. परंतु भाजपा शिवसेना पक्षाच्या युती नंतर राणा यांनी निवडणुकीच्या रिंगणात उतरण्यासाठी पुन्हा एकदा राष्ट्रवादी पक्षाचा सहारा घेतलेला आहे. त्यामुळे कट्टर राष्ट्रवादी कार्यकर्ते त्यांचा प्रचार करणार का? ह्यावरच सध्या प्रश्नचिन्ह निर्माण झालेले आहे. त्यामुळे साहजिकच अडसूळ यांचा विजय निश्चित मानला जात आहे.

Leave a comment

0.0/5