Skip to content Skip to footer

माथाडी कामगाराला खासदार बनवून दिल्लीत पाठवायचे आहे

शिवसेना भाजपा युतीची जाहीर सभा रविवारी कोल्हापूर येथे तपोवन मैदान करवीर नगरीत पार पडली. या सभेला हजारो-लाखोंच्या वर जनसमुदाय तथा शिवसेना आणि भाजपा कार्यकर्ते हजर होते. या सभेला आणखी महत्व वाढले ते म्हणजे, माथाडी कामगार नेते नरेंद्र पाटील यांनी कोल्हापूरच्या जाहीर सभेत हातात शिवबंधंन बांधून शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केलेला आहे. त्यामुळे आता महाराष्ट्रात काम करणाऱ्या माथाडी कामगारांचे नेतृत्व करणारे नरेंद्र पाटील यांना सुद्धा सातारा मतदार संघातून भारी बहुमताने जिंकून खासदार बनवून दिल्लीला पाठवायचे आहे असे वक्त्यव्य पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी बोलून दाखविले आहे.

काही दिवसापूर्वी माथाडी कामगार नेते नरेंद्र पाटील यांनी पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांची त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतलेली होती त्यावेळी उद्धव ठाकरे आणि नरेंद्र पाटील यांच्यात चर्चा सुद्धा झालेली होती. परंतु कोल्हापूर येथील सभेला पाटील हे शिवसेना पक्षात प्रवेश करणार हे निश्चितच झाले होते. सातारा मतदार संघात राष्ट्रवादी पक्षातून छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या विरोधात माथाडी कामगार नेते आणि आता शिवसेनेचे उमेदवार म्हणून नरेंद्र पाटील हे उतरणार आहे त्यामुळे सातारा मतदार संघात होणारी ही लढत अटी-तटीची होणार असेच बोलले जात आहे. तसेच, येत्या निवडणुकांमध्ये राष्ट्रवादीला मत देणार असाल, तर अजित पवार धरणे कशी भरतात हे आठवा. कोल्हापूर हिंदुत्ववाद्यांचा बालेकिल्ला आहे. इथे शिवसेनेचाच भगवा फडकणार आहे. त्यामुळे येत्या निवडणूकांमध्ये आपल्याला माथाडी कामगाराला मतदान करून त्यांना खासदार बनवून दिल्लीला पाठवायचे आहे असेही त्यांनी म्हंटले.

Leave a comment

0.0/5