Skip to content Skip to footer

गिरीश महाजन दिसल्यास महाआघाडीच्या नेत्यांना धडकीच भरते – उद्धव ठाकरे

भाजपा आणि शिवसेना महायुतीची पहिली जाहीर सभा छत्रपती शाहू महाराजांच्या करवीर नगरीत कळंबा येथील तपोवन मैदानात रविवारी संपन्न झाली. सभेच्या पूर्वी पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कोल्हापूरच्या आंबाबाईचे दर्शन घेतले होते. पुढे भाषणाला सुरवात रासप नेते महादेव जानकर, रिपाई नेते रामदार आठवले, कोल्हापूर पालकमंत्री चंद्र्कांतदादा पाटील, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अंतिम शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी सभेला उद्देशून भाषण केले. या सभेला “न भूतो न भविष्यती” अशी हजारो-लाखोचा जनसमुदाय लोटला होता.

आपल्या सभेची सुरवात करताना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी आपल्या दोन्ही कोल्हापुरातील उमेदवारांना निवडणूक आणण्याचे आव्हानच सर्व कोल्हापुरातील जनतेला, शिवसैनिकाना आणि भाजपा कार्यकर्त्यांना केलेले होते. त्यानंतर विरोधानकांवर तोंडसुख घेतले. आता युती झाल्यामुळे टीका कुणावर करावी, हेच समजत नाही, कारण समोर कुणीच शिल्लक नाही, असे ही उद्धव ठाकरे यांनी बोलून दाखविले. आघाडीच्या नेत्यांनी निवडणुकीतून माघार घेण्यावरही त्यांनी टीका केली. आता गिरीश महाजन दिसले की विरोधकांना धडकी भरते, अशा शब्दांत त्यांनी काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांची खिल्ली उडवली. काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे नेते रोज एकमेकांना अजून पक्षातच आहात ना? भाजप-शिवसेनेत गेला नाहीत ना? असा प्रश्न विचारत असल्याचा टोमणाही उद्धव ठाकरेंनी लगावला.

आज सुजय विखे पाटील असो किंवा रणजितसिहं मोहिते-पाटील यांना भाजपा पक्षात आणण्यासाठी मोलाची कामगिरी भाजपा मंत्री गिरीश महाजन यांनीच बजावलेली आहे. सुजय विखे पाटील यांना नगर मधून निवडणुकीला उभे राहण्यासाठी महाजन यांनीच मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घालून दिलेली होती तसेच मोहिते-पाटील यांनी सुद्धा गिरीष महाजन यांना भेटूनच भाजपा पक्षात प्रवेश केला होता त्यामुळे आज महाजन यांच्या बरोबर काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे कार्यकर्ते दिसले तर या दोन्ही पक्षाच्या नेत्यांना धडकीच भरते असे सुद्धा बोलून दाखविले होते आणि कोल्हापुरात भगवा फडकलाच पाहिजे असे सुद्धा बोलून दाखविले.

Leave a comment

0.0/5